27 November 2020

News Flash

Asian Games 2018 – सिंधूची आक्रमक सुरुवात, जपानच्या अकाने यामागुचीवर केली मात

सिंधूचा आश्वासक खेळ

पी. व्ही. सिंधूने जपानी प्रतिस्पर्धी खेळाडूचं आव्हान काढलं मोडीत

आशियाई खेळांच्या दुसऱ्या दिवशी भारतीय बॅडमिंटनपटूंनी चांगली सुरुवात केली आहे. बॅडमिंटन महिला सांघिक प्रकारातील पहिल्या एकेरी सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीवर २१-१८, २१-१९ अशी मात करत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे.

अपेक्षेप्रमाणे सेटच्या सुरुवातीपासून दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली झुंज पहायला मिळाली. काही क्षणांनंतर यामागुचीने आपल्या ताकदवान फटक्यांचा वापर करत सिंधूला मागे टाकलं. पहिल्या सेटच्या मध्यांतरानंतरही यामागुचीकडे ३ गुणांची आघाडी होती. मात्र सेटच्या उत्तरार्धात सिंधूने आपल्या खेळाचा गिअर बदलत जोरदार पुनरागमन केलं. आपल्या ठेवणीतल्या स्मॅश फटक्यांचा वापर करत सिंधूने पहिला सेट २१-१८ च्या फरकाने खिशात घातला.

दुसऱ्या सेटमध्येही अपेक्षेप्रमाणे दोघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला. दोन्ही खेळाडू एकमेकींना पुढे जाण्याची संधी देत नव्हत्या. यादरम्यान सिंधूने काही आक्रमक फटके खेळत यामागुचीला मात देण्याचा प्रयत्न केला. याला यामागुचीनेही ड्रॉपचे सुंदर फटके खेळत जोरदार प्रत्युत्तर दिलं. मध्यांतरापर्यंत यामागुचीने सामन्यात एका गुणाची नाममात्र आघाडी घेतली. मध्यांतरानंतर सिंधूने सामन्यात पुनरागमन करत बरोबरी साधली. अखेरच्या क्षणापर्यंत दोघींमधला हा सामना १९-१९ असा बरोबरीत होता. मात्र मोक्याच्या क्षणी सिंधूने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत यामागुचीला चूक करायला भाग पाडत सेट २१-१९ ने खिशात घातला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2018 8:25 am

Web Title: asian games 2018 indonesia p v sindhu began her campaign on winning note beat japanese opponent
Next Stories
1 Asian Games 2018 : कुस्तीपटू विनेश फोगाटला सुवर्ण; नेमबाजपटू दिपक कुमार, लक्ष्यची ‘रौप्य’कमाई
2 सोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज
3 Ind vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली ‘ही’ कमाल…
Just Now!
X