13 July 2020

News Flash

Asian Games 2018 : इंडोनेशियाचे पदक विजेते खेळाडू बक्षिसाची रक्कम भूंकपग्रस्तांना दान देणार

लोंबाक बेटांवर भूकंपामुळे मोठी हानी

इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई खेळांआधी लोंबाक बेटांवर भूकंपाचे तीव्र धक्के बसले होते. या भूकंपात इंडोनेशियामध्ये मोठी वित्त आणि मनुष्यहानी झाली. ५०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले तर जवळपास १० हजार लोकांना बेघर व्हावं लागलं. या घटनेनंतर आशियाई स्पर्धांमध्ये पदकाची कमाई करणाऱ्या इंडोनेशियन खेळाडूंनी आपल्या बक्षिसाची रक्कम भूकंपग्रस्तांना दिली आहे.

बॅडमिंटनमध्ये पुरुषांमध्ये विजेतेपद मिळवणारा खेळाडू जोनाथन ख्रिस्ती आपल्या कमाईतली काही रक्कम आपल्या भूकंपग्रस्तांना देणार आहे. सध्या मी मिळवलेल्या बक्षिसाची रक्कम ही भूकंपग्रस्तांच्या अधिक मदतीला येणार आहे. त्यामुळे माझ्या बक्षिसातला काही भाग मी दान करण्याचं ठरवलं असल्याचं, जोनाथन म्हणाला. पर्यटकांच्या दृष्टीने महत्वाचं ठिकाण असलेल्या लोंबाक बेटांवर भूकंपामुळे अंदाजे ५० कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

दरम्यान पुरुष बॅडमिंटन दुहेरी स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या इंडोनेशियाच्या बॅडमिंटनपटूंनी आपल्या जर्सी आणि बॅडमिंटन रॅकेटचा लिलाव करण्याचं ठरवलं आहे. यातून मिळणारी रक्कम हे भूकंपग्रस्त भागात मदतकार्यासाठी दिला जाणार आहे. इंडोनेशियाच्या खेळाडूंनी घेतलेल्या या निर्णयाचं सोशल मीडियावर कौतुक होतं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2018 4:27 pm

Web Title: asian games 2018 indonesian medal winners contribute towards lombok cause
टॅग Asian Games 2018
Next Stories
1 Ind vs Eng : रविचंद्रन आश्विन सर्वोत्कृष्ट ऑफस्पिनर, इंग्लंडच्या माजी खेळाडूची स्तुतीसुमनं
2 Ind vs Eng : मोहम्मद शामीची अँडरसनवर स्तुतीसुमने
3 National Sports Day : चंद्रप्रकाशात हॉकीचा सराव करणाऱ्या ध्यानचंद यांना सचिन तेंडुलकरचा सलाम
Just Now!
X