Asian Games 2018 : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने आशियाई क्रीडा स्पर्धांच्या नवव्या दिवशी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. नीरजने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ८८.०६ मीटरची सर्वोकृष्ट फेक केली. हा फेकीमुळे त्याने राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. त्याची वैयक्तिक सर्वोकृष्ट कामगिरी ठरली. मात्र आशियाई क्रीडा स्पर्धांमधील विक्रम त्याला मोडता आला नाही. या स्पर्धेत ८९.१५ मीटरची सर्वात लांब फेक करण्यात आली होती.

आजच्या सामन्यात अंतिम फेरीच्या लढतीत प्रत्येक खेळाडूला ५ संधी देण्यात आल्या होत्या. त्यात नीरजने तिसऱ्या प्रयत्नात फेकलेल्या भाल्याने सुवर्णवेध घेतला. त्याआधी स्पर्धेत त्याने पहिल्या प्रयत्नात ८३. ४६ मीटरची फेक केली होती. तर त्याचा दुसरा प्रयत्न अपात्र ठरवण्यात आला. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात त्याने ८३. २५ मीटर लांब फेक केली आणि पाचवा प्रयत्न पुन्हा अपात्र ठरला. पण त्याने तिसऱ्या प्रयत्नात केलेली कामगिरी त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यास समर्थ ठरली.

य बरोबरच नीरजने एक विक्रम केला. आशियाई स्पर्धांमध्ये अशी कामगिरी कररणारा नीरज पहिला भारतीय खेळाडू ठरला. या आधी भारताला या स्पर्धेत भालाफेक या क्रीडाप्रकरात कधीही सुवर्णपदक कमावता आले नव्हते. मात्र आज नीरजने ऐतिहासिक कामगिरी केली आणि भारताला भालाफेकमधील पाहिलेवाहिले सुवर्णपदक मिळवून दिले.