News Flash

Asian Games 2018 : नीरज चोप्राच्या भाल्याचा ‘सुवर्ण’वेध

निरजने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ८८.०६मीटरची सर्वोकृष्ट फेक केली.

भालाफेकपटू नीरज चोप्रा

Asian Games 2018 : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने आशियाई क्रीडा स्पर्धांच्या नवव्या दिवशी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. नीरजने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ८८.०६ मीटरची सर्वोकृष्ट फेक केली. हा फेकीमुळे त्याने राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. त्याची वैयक्तिक सर्वोकृष्ट कामगिरी ठरली. मात्र आशियाई क्रीडा स्पर्धांमधील विक्रम त्याला मोडता आला नाही. या स्पर्धेत ८९.१५ मीटरची सर्वात लांब फेक करण्यात आली होती.

आजच्या सामन्यात अंतिम फेरीच्या लढतीत प्रत्येक खेळाडूला ५ संधी देण्यात आल्या होत्या. त्यात नीरजने तिसऱ्या प्रयत्नात फेकलेल्या भाल्याने सुवर्णवेध घेतला. त्याआधी स्पर्धेत त्याने पहिल्या प्रयत्नात ८३. ४६ मीटरची फेक केली होती. तर त्याचा दुसरा प्रयत्न अपात्र ठरवण्यात आला. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात त्याने ८३. २५ मीटर लांब फेक केली आणि पाचवा प्रयत्न पुन्हा अपात्र ठरला. पण त्याने तिसऱ्या प्रयत्नात केलेली कामगिरी त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यास समर्थ ठरली.

दरम्यान, त्याने हा विजय भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 6:39 pm

Web Title: asian games 2018 neeraj chopra won gold
टॅग : Asian Games 2018
Next Stories
1 Ind vs Eng : साकलेन मुश्ताक म्हणतो विराट सचिनच्या जवळ पोहोचणार…
2 Asian Games 2018 : द्युती चंदला ओडीशा सरकारकडून १.५ कोटींचं बक्षिस
3 क्रिकेटपटूकडून हुंड्यासाठी बायकोचा छळ, गुन्हा दाखल
Just Now!
X