12 November 2019

News Flash

Asian Games 2018 : ओडीशा सरकारकडून ४ महिला हॉकीपटूंना १ कोटींचं बक्षीस

महिला हॉकी संघाला रौप्यपदक

रौप्यपदक विजेता भारतीय महिला हॉकी संघ

१८ व्या एशियाड स्पर्धेत हॉकीमध्ये रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या महिला संघावर ओडीशाचे मुख्यमंत्री भलतेच खूश झाले आहेत. महिला संघातील ४ ओडीशाच्या खेळाडूंना मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी १ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. भारतीय संघात सुनिता लाक्रा, नमिता टोपो, निलीमा मिन्झ आणि दिप ग्रेस इक्का या खेळाडूंना हे बक्षीस दिलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.

तब्बल २० वर्षांनी भारतीय महिला हॉकी संघात ओडीशाच्या ४ खेळाडूंना जागा मिळाली होती. अंतिम फेरीत जपानवर मात करण्यात भारतीय महिलांना अपयश आलं असलं तरीही या स्पर्धेत त्यांनी केलेला खेळ हा वाखणण्याजोगा होता. ओडीशा सरकारने भारतीय हॉकी संघाचं प्रायोजकत्व स्विकारलेलं आहे. याचसोबत नोव्हेंबर महिन्यात ओडीशामध्ये हॉकी विश्वचषकाचं आयोजन केलं जाणार आहे.

First Published on September 2, 2018 9:09 am

Web Title: asian games 2018 odisha announces rs 1 crore for four women hockey players