Asian Games 2018 Live : आशियाई खेळांच्या स्पर्धेत शनिवारी भारताने एका सुवर्णपदकाची कमाई केली. सातव्या दिवसाच्या खेळात भारतीय गोळाफेकपटू तजिंदर पाल सिंग तूर याने भारताला ही सुवर्णकमाई करून दिली. त्याने २०.७५ मीटरची विक्रमी फेक केली. या स्पर्धेच्या इतिहासतील ही विक्रमी फेक ठरली. तजिंदर पाल याने सर्वप्रथम १९.९६ मीटरची फेक केली होती. त्या नंतर सर्व प्रतिस्पर्ध्यांनी त्याची ही फेक मोडून काढल्याचा प्रयत्न केला. पण ते कोणालाही शक्य होऊ शकले नाही. चीनच्या खेळाडूने १९ मीटरचा टप्पा ओलांडला होता. पण त्या नंतरच्या प्रयत्नात तजिंदरने २० मीटरचा टप्पा ओलांडत थेट २०. मीटरची विक्रमी फेक केली. त्याची ही फेकदेखील कोणीही मोडू शकले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदी यांनी त्याचे कौतुक केले आणि त्याला शुभेच्छा दिल्या. ‘ऐतिहासिक सुवर्ण पदक आणि नव्या विक्रमासाठी तुला शुभेच्छा!’, असा संदेशही त्यांनी आपल्या ट्विटमधून त्याला दिला. तसेच, नवा विक्रम केल्याबद्दल भारताला तुझा गर्व आहे, असेही त्यांनी नमूद केले.

भारताच्या तेजींदरपाल सिंग तूरने आशियाई स्पर्धेतील गोळाफेकीत भारताला सुवर्णपदक पटकावून दिले. त्याने पाचव्या प्रयत्नांत 20.75 मीटर गोळाफेक करून भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने या कामगिरीसह आशियाई विक्रमही नावावर केला. आशियाई स्पर्धेत 1951 ते आत्तापर्यंत भारताला सर्वाधिक 9 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्यपदक गोळाफेकीत मिळालेली आहेत. ती परंपरा तेजींदरपालने कायम राखली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian games 2018 pm modi congratulated tajinder pal toor on gold medal win
First published on: 26-08-2018 at 08:38 IST