Asian Games 2018 : भारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पहिल्याच दिवशी ६५ किलो वजनी गटात त्याने जपानच्या दाईची ताकातानी याला ११-८ असे पराभूत केले. या बरोबरच बजरंगने भारताला यंदाचे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. हे भारताला मिळालेले पहिले सुवर्ण पदक आणि हा विजय बजरंगने दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केला. बजरंगने ट्विट करुन अटलजींना वंदन केले आणि आपले पदक त्यांना समर्पित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संदर्भात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग पुनिया याने कौतुक केले. आज अटलजींच्या शोकसभेत मोदी यांनी आपल्या भावना वाट करून दिली. बजरंग पुनिया याने सुवर्णपदक जिंकून भारताचे नाव उंचावले आहे. त्याने आपले सुवर्ण पदक भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित केले.बजरंग स्वतः अटलजींना कधी भेटला असेल की नाही, याबाबत कल्पना नाही. पण तशी शक्यता फार कमी आहे. पण असे असूनही त्याने आपले पदक आणि विजय अटलजींना समर्पित करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. यातूनच अटलजी किती महान होते. हे दिसून येते, असे मोदी म्हणाले. तसेच बजरंगच्या विजयाचे आणि या समर्पणाचे त्यांनी कौतुक केले.

बजरंगने सुरुवातीला ६-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर ताकातानी याने पुनरागमन करत ६-४ असा सामना रंगात आणला. पण सामन्याच्या अखेरीस ११-८ अशा फरकाने भारताच्या बजरंग पुनियाने सामना जिंकला आणि भारताला स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. भारताचे हे संपूर्ण दिवसातील एकमेव सुवर्णपदक ठरले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian games 2018 pm narendra modi praises bajrang puniya atal bihari vajpeyee
First published on: 20-08-2018 at 19:46 IST