News Flash

Asian Games 2018: सिंधूने रौप्यपदक जिंकल्यानंतर तिचे वडील म्हणतात…

३६ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर भारताला आशियाई खेळात बॅडमिंटनमध्ये पदक

पी.व्ही. रामणा

आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत महिलांच्या अंतिम सामन्यात सुर्वणपदक जिंकण्याचं पी. व्ही. सिंधूचं स्वप्न भंगलं आणि तिला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगने सिंधूवर २१-१३, २१-१६ अशी मात केली. सुवर्णपदक जिंकता आले नसले तरी सिंधूच्या कामगिरीवर तिचे वडील खूश आहेत. रौप्यपदक जिंकणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीचे पी.व्ही. रामणा यांनी गोड कौतूक केले आहे.

सिंधूने आशियाई खेळांमध्ये केलेल्या कामगिरीवर मी खूश असल्याचे रमण यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘सिंधू फक्त २३ वर्षांचीच आहे. वय हा महत्वाचा फॅक्टर अजूनही तिच्या बाजूने आहे. तिला अजून खूप काही साध्य करायचं आहे. आजच्या सामन्यामधील प्रतिस्पर्ध्याकडूनही सिंधूने शिकायला हवे असे मतही रण यांनी व्यक्त केले आहे. तिने आज झालेल्या अंतिम सामन्यातून चीन तैपईच्या ताई झू यिंगच्या खेळातून शिकत पुढे जायला हवं. तिच्या खेळातून चांगल्या गोष्टी शिकल्या तर त्याचा फायदा पुढच्या सामन्यांसाठी नक्की होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अंतिम सामना सुरुवातीपासूनच एकतर्फी राहिला. चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगने सिंधूवर २१-१३, २१-१६ अशा सरळ सेटमध्ये मात केली. आतापर्यंत सिंधू आणि यिंग दहावेळा समोरासमोर आले आहेत त्यापैकी यिंगने सिंधूला ९ वेळा पराभूत केलं आहे. सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये यिंगवर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता, मात्र आज या कामगिरीची पुनरावृत्ती करणं तिला जमलं नाही. अंतिम सामन्यात यिंगने सिंधूचा केलेला पराभव हा तिचा १० वा पराभव ठरला आहे.

सिंधूचा पराभव झाला असला तरी खेळात बॅडमिंटनमध्ये अंतिम फेरीमध्ये जाणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या या रौप्यपदकाच्या कमाई करण्याच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर अनेकांनी ट्विटवरून तिचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पंतप्रधान मोदी

राज्यवर्धनसिंह राठोड

विनोद तावडे

अमूल

सिंधूचा पराभव झाला असला तरी तब्बल ३६ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर भारताला आशियाई खेळात बॅडमिंटनमध्ये पदक मिळालं आहे. सिंधूने रौप्यपदक जिंकले आहे तर सायना नेहवालने कांस्यपदकावर नाव कोरले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 4:48 pm

Web Title: asian games 2018 pv sindhu father pv ramana reaction on her silver medal win
टॅग : Asian Games 2018
Next Stories
1 Asian Games 2018 : भारतीय टेबल टेनिस संघाला कांस्यपदक
2 Asian Games 2018 : सिंधूचं सुवर्णस्वप्न भंगलं, अंतिम फेरीत पराभवामुळे रौप्यपदकावर समाधान
3 नाशिक पोलिस आयुक्त ठरले ‘आयर्नमॅन’
Just Now!
X