इंडोनेशियातील जकार्ता शहरात खेळवण्यात येणाऱ्या १८ व्या आशियाई खेळांमधील भारतीय हॉकी संघाचं वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाचा समावेश अ गटात करण्यात आला असून महिलांना ब गटात स्थान मिळालेलं आहे. आगामी २०२० टोकियो ऑलिम्पिकच्या दृष्टीकोनातून ही स्पर्धा भारतासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. आशियाई खेळांचं विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला टोकिया ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे.

आशियाई खेळांसाठी पुरुष संघांची गटवारी –

अ गट – भारत, कोरिया, जपान, श्रीलंका, हाँगकाँग चायना
ब गट – मलेशिया, पाकिस्तान, बांगलादेश, ओमान, थायलंड, इंडोनेशिया

भारतीय पुरुष संघाचं आशियाई खेळांमधलं वेळापत्रक –

२२ ऑगस्ट – भारत विरुद्ध हाँगकाँग चीन (संध्याकाळी ६ वाजता)
२४ ऑगस्ट – भारत विरुद्ध जपान (संध्याकाळी ४ वाजता)
२६ ऑगस्ट – भारत विरुद्ध कोरिया (संध्याकाळी ४ वाजता)
२८ ऑगस्ट – भारत विरुद्ध श्रीलंका (दुपारी २ वाजता)

———————————————————————————————-

आशियाई खेळांसाठी महिला संघांची गटवारी –

अ गट – चीन, जपान, मलेशिया, हाँगकाँग चीन, चीन तैपेई
ब गट – कोरिया, भारत, थायलंड, कझाकिस्तान, इंडोनेशिया

भारतीय महिला संघाचं आशियाई खेळांमधलं वेळापत्रक –

१९ ऑगस्ट – भारत विरुद्ध इंडोनेशिया (रात्री ८ वाजता)
२१ ऑगस्ट – भारत विरुद्ध कझाकिस्तान (दुपारी २ वाजता)
२५ ऑगस्ट – भारत विरुद्ध कोरिया (संध्याकाळी ६ वाजता)
२७ ऑगस्ट – भारत विरुद्ध थायलंड (संध्याकाळी ६ वाजता)