इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या द्युती चंदवर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. ओडीशा सरकारने द्युतीच्या या कामगिरीसाठी १.५ कोटींचं इनाम घोषित केलं. द्युनीतेन १०० मी. शर्यतीच्या अंतिम फेरीत दुसरं स्थान कमावत रौप्य पदकाची कमाई केली. अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने द्युतीचं सुवर्णपदक हुकलं. ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी चंदला बक्षिसाची घोषणा केली आहे. याचसोबत ओडीशा ऑलिम्पिक असोसिएशननेही द्युतीला ५० हजाराचं बक्षिस जाहीर केलं आहे.

“द्युतीने केलेल्या कामगिरीचा आम्हा सर्वांना अभिमान असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केलं आहे. यापुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सरावाला आवश्यक त्या सर्व सुविधा द्युतीला उपलब्ध करुन देणात येणार आहेत.” मुख्यमंत्री कार्यालयातून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात द्युतीचं कौतुक करण्यात आलं आहे. याचसोबत अनेक मान्यवर व्यक्तींनी द्युतीचं कौतुक केलं आहे.