05 August 2020

News Flash

Asian Games 2018 : स्वप्ना बर्मनच्या पायांना मिळणार आधार, Nike कंपनी बुटांचा खर्च उचलण्याच्या तयारीत

स्वप्नाच्या दोन्ही पायांना ६ बोटं

स्वप्ना बर्मन (संग्रहीत छायाचित्र)

इंडोनेशियातील आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये Heptathlon प्रकारात सुवर्णपदक विजेच्या स्वप्ना बर्मनची चिंता अखेर मिटण्याची चिन्ह आहेत. स्पोर्ट्स फूटवेअर क्षेत्रातील नामाकिंत Nike कंपनी स्वप्नासाठी विशेष बुट तयार करण्याच्या तयारीत आहे. स्वप्नाच्या दोन्ही पायांना जन्मतः सहा बोटं आहेत. त्यामुळे सरावादरम्यान तिला अनेकदा अनवाणी पायांनी पळावं लागत होतं. तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळताना तिला बुट तयार करुन घ्यावे लागत होते.

मात्र जकार्तामध्ये केलेल्या सुवर्णकामगिरीनंतर चेन्नईतील Integral Coach Factory च्या अधिकाऱ्यांनी Nike कंपनीला स्वप्नासाठी विशेष बुट बनवण्याची विनंती केली आहे. Heptathlon प्रकारात खेळाडूला तिहेरी उडी, भालाफेक आणि शर्यत अशा विविध प्रकारांमध्ये सहभागी व्हावं लागतं. या प्रत्येक प्रकारासाठी खेळाडूंकडे चांगल्या दर्जाचे किमान ५ बुट असणं आवश्यक असतं. मात्र स्वप्नाच्या दोन्ही पायांना असणाऱ्या ६ बोटांमुळे तिला प्रत्येक खेळासाठी वेगळे बुट घेणं शक्य नव्हतं. मात्र Nike कंपनी पुढाकार घेत असल्यामुळे तिच्या मागची चिंता आता मिटण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 10:45 am

Web Title: asian games 2018 swapna barma indian athlete with 12 toes to get sponsored and customised shoes
टॅग Asian Games 2018
Next Stories
1 Youth Boxing Championship : साक्षी चौधरीला सुवर्णपदक; मनिषा-अनामिका जोडीला रौप्य
2 कडव्या झुंजीनंतर फेडरर तिसऱ्या फेरीत
3 CSKच्या ‘या’ खेळाडूने वाढदिवशीच घेतला निवृत्तीचा निर्णय…
Just Now!
X