11 July 2020

News Flash

Asian Games 2018 : ‘स्वप्ना’वत कामगिरी, भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक

हेप्टॉथ्लॉनमध्ये स्वप्ना बर्मनने ६०२६ गुण मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.

जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या स्वप्ना बर्मनने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अॅथलेटीक्समधील हेप्टॉथ्लॉन प्रकारामध्ये स्वप्ना बर्मनने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताचे दिवसभारतील दुसरे तर आशियाई क्रीडा स्पर्धेतील ११ वे सुवर्णपदक आहे.

पात्रता फेरीमधील पहिल्या दोन (भालाफेक आणि उडी) निकषांमध्ये मोठी आघाडी घेत पहिले स्थान कायम राखल्यानंतर स्वप्नाने ८०० मीटरची शर्यत पूर्ण करून सुवर्णपदकावर नाव कोरले. हेप्टॉथ्लॉन या खेळात अॅथलेटीक्सच्या सात प्रकारांचा समावेश असतो. यामध्ये 200 मी. आणि 800 मी. धावण्याची शर्यत होते. त्याचबरोबर 100 मी. अडथळ्याची शर्यत खेळवली जाते. त्यानंतर उंच उडी. लांब उडी, गोळाफेक आणि भालाफेक या प्रकारांचा समावेश असतो.  हेप्टॉथ्लॉनमध्ये स्वप्ना बर्मनने ६०२६ गुण मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2018 7:29 pm

Web Title: asian games 2018 swapna barman won gold medal
टॅग Asian Games 2018
Next Stories
1 Asian Games 2018 : अरपिंदर सिंहची ‘तिहेरी उडी’ सुवर्णपदकावर
2 विनेश फोगाट-बजरंग पुनिया अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीत
3 Asian Games 2018 : इंडोनेशियाचे पदक विजेते खेळाडू बक्षिसाची रक्कम भूंकपग्रस्तांना दान देणार
Just Now!
X