आशियाई खेळांच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्राच्या राही सरनौबतने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली. २५ मी. पिस्तुल प्रकारात राहीने सुवर्णपदक पटकावले. असा पराक्रम करणारी राही ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.

पहिल्या फेरीपासून सर्वोत्तम खेळ करत राहीने आपलं अव्वल स्थान कायम राहिलं होतं. मात्र शेवटच्या क्षणांमध्ये थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने राहीला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं. अंतिम फेरीआधी दोन्ही खेळाडूंचे गुण समान झाले, त्यामुळे सुवर्णपदकासाठी राही आणि थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूमध्ये शूटऑफवर निर्णय घेण्यात आला. पहिल्या शूटऑफमध्येही दोन्ही खेळाडूंचे ४-४ गुण झाल्यामुळे दुसऱ्यांदा शूटआऊटवर सामना खेळवण्यात आला. या शूटऑफवर राहीने ३-२ ने बाजी मारत सुवर्णपदक आपल्या नावे केलं.

राहीने भारतासाठी सुर्वण पदक जिंकताच नेटकऱ्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. हे पदक जिंकल्यानंतर काही वेळातच ट्विटवर #RahiSarnobat हा हॅशटॅग दुसऱ्या क्रमांकावर ट्रेण्ड होत होता.

राजनाथ सिंह

राज्यवर्धन सिंह राठोड

अमित शाह

अभिनव बिंद्रा

सोनाली कुलकर्णी म्हणजे महाराष्ट्राची पोस्टरगर्ल

जयंत पाटील

मेजर सुरेंद्र पुनिया

सुनिल देवधर

हर्ष सांघवी

अशोक गोहलत

शिवराज सिंह चौहान

राहीने जिंकलेले सुवर्ण पदक हे भारताच्या खात्यातील चौथे तर शुटिंगमधील भारतासाठीचे सातवे पदक आहे. भारताने आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये ११ पदके जिंकली आहेत.