News Flash

Asian Games 2018 : Google Search Trends मध्ये राही सरनौबत, विनेश फोगट, सौरभ चौधरी अव्वल

एशियाडमध्ये भारतीयांची आश्वासक कामगिरी

सुवर्णपदक विजेती विनेश फोगट

आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या ३ भारतीय खेळाडूंनी Google Search Trends मध्ये बाजी मारली आहे. राही सरनौबत, विनेश फोगट आणि सौरभ चौधरी यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी भारतीयांनी प्रचंड रस दाखवल्याचं समजतंय. विनेश फोगट ५० किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई करत कुस्तीत सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला ठरली.

२ लाखांपेक्षा जास्त लोकांनी विनेश फोगटने पदक जिंकल्यानंतर गुगलवर तिच्याबद्दल अधिकची मााहिती जाणून घेण्यासाठी रस दाखवला. तर २० हजारहून अधिक लोकांनी सौरभ चौधरीची माहिती गुगलवर शोधली. तर दोन वर्षांच्या कालावधीनंतर दुखापतीवर मात करत पुनरागमन करणाऱ्या राही सरनौबतबद्दल माहिती करुन घेण्यासाठी २० हजाराहून जास्त लोकं गुगलवर होते. गुगल इंडियाने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन याची माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 3:23 pm

Web Title: asian games 2018 vinesh phogat saurabh chaudhary rahi sarnobat dominate google search trends
टॅग : Asian Games 2018
Next Stories
1 Ind vs Eng : …म्हणून कसोटी पदार्पण माझ्यासाठी सोपं ठरलं – ऋषभ पंत
2 Asian Games 2018 : जपानवरील विजयासोबत भारतीय हॉकी संघाचा नवीन विक्रम
3 Ind vs Eng : …तरीही बुमराहला गोलंदाज म्हणून निवडलं नसतं – मायकल होल्डिंग
Just Now!
X