१८ व्या आशियाई खेळांना आजपासून इंडोनेशियात सुरुवात होणार आहे. जकार्ता आणि पालेमबर्ग या दोन महत्वाच्या शहरांमध्ये हे सामने रंगणार आहेत. आशियाई खंडातील तब्बल ४५ देशांचे खेळाडू या मानाच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. एशियाडच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन शहरांमध्ये खेळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून, एशियाडचा स्वागतसोहळ्याला सुरुवात होणार आहे.

जाणून घ्या १८ व्या एशियाड खेळांच्या प्रक्षेपणाबद्दलची महत्वाची माहिती –

कालावधी : १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१८

वेळ : सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत (वेळ अंदाजे नमूद केली आहे)

थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, सोनी टेन २, सोनी टेन ३

लाईव्ह स्ट्रिमींग : सोनी लाईव्ह अॅप