X
X

एशियाड पदक विजेत्या हरिश कुमारचा जगण्यासाठी संघर्ष, दिल्लीत चहाच्या टपरीवर करतोय काम

हरिशला एशियाडमध्ये कांस्यपदक

इंडोनेशियात पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये Sepak Takraw प्रकारात भारतीय संघाने कांस्यपदकाची कमाई केली. स्पर्धा पार पडल्यानंतर भारतीय संघातल्या हरीश कुमारचा आता जगण्यासाठीचा संघर्ष सुरु झाला आहे. आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी हरीशने वडिलांच्या चहाच्या टपरीवर काम करण्यास सुरुवात केली आहे. ANI वृत्तसंस्थेला हरीश कुमारने विशेष मुलाखत दिली.

माझा परिवार मोठा आहे. मात्र या तुलनेमध्ये घरात कमावणारी माणसं कमी आहेत. यासाठी माझ्या वडिलांसोबत चहाच्या टपरीवर मला काम करावं लागत आहे. दिवसात दुपारी २ ते संध्याकाळी ६ हा वेळ मी सरावासाठी राखून ठेवतो. मात्र भविष्यात या खेळामध्ये अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी चांगल्या नोकरीची आवश्यकता असल्याचं हरीश म्हणाला. २०११ साली स्थानिक पातळीवर खेळणाऱ्या हरीशचं कौशल्य त्याचे प्रशिक्षक हेमराज यांनी हेरलं. यानंतर हेमराज यांनी हरीशला ‘साई’ (Sports Authority of India) च्या कार्यालयात नेलं. यानंतर हरीशला सरकारकडून गणवेश व इतर मदत मिळण्यास सुरुवात झाली.

हरीशचे वडील दिल्लीत रिक्षा चालवतात, याशिवाय चहाच्या टपरीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर हरीशचं घर चालतं. सरकारी प्रयत्नातून हरीशला घरही मिळालं आहे. मात्र कुटुंबांचा गाडा चालवण्याची जबाबदारी व खेळाचा सराव अशी दुहेरी जबाबदारी सध्या त्याच्या खांद्यावर आहे. हरीशला सरकारी नोकरी मिळाल्यास त्यातून मिळणाऱ्या अर्थसहाय्यावर तो देशाचं नाव आणखी उज्वल करेल असा आत्मविश्वा त्याच्या घरच्यांनी व्यक्त केला आहे.

अवश्य वाचा – ISSF World Championship : एअर रायफल नेमबाजीत भारताच्या ह्रदय हजारिकाला सुवर्णपदक

22

  • Tags: Asian Games 2018,
  • Just Now!
    X