21 September 2020

News Flash

संजिता चानू, सुकेन डे यांच्या कामगिरीकडे लक्ष

ग्लासगो येथील राष्ट्रकुल स्पर्धेत मिळविलेल्या दहा पदकांची यशोमालिका आशियाई स्पध्रेतही राखण्याचे भारतीय वेटलिफ्टर्सचे ध्येय असून त्यादृष्टीनेच सुकेन डे व खुकुमचाम संजिता चानू यांच्या कामगिरीकडे शनिवारी

| September 20, 2014 05:12 am

ग्लासगो येथील राष्ट्रकुल स्पर्धेत मिळविलेल्या दहा पदकांची यशोमालिका आशियाई स्पध्रेतही राखण्याचे भारतीय वेटलिफ्टर्सचे ध्येय असून त्यादृष्टीनेच सुकेन डे व खुकुमचाम संजिता चानू यांच्या कामगिरीकडे शनिवारी लक्ष राहणार आहे. राष्ट्रकुलमध्ये पदक मिळविलेल्या खेळाडूंपैकी सात खेळाडूंना भारताने आशियाई स्पर्धेत संधी दिली आहे. त्यांच्यासह एकूण १० खेळाडूंचे पथक भारताने उतरविले आहे. पुरुषांच्या ५६ किलो गटात सुकेन याच्यावर भारताची मोठी भिस्त आहे. त्याने ग्लासगो येथे सोनेरी कामगिरी केली होती. महिलांच्या ४८ किलो गटात चानू हिने सुवर्णपदकाची कमाई केली होती, असे भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षक हंसा शर्मा यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 5:12 am

Web Title: asian games sanjita chanu weightlifting
Next Stories
1 भारताला चार पदकांची संधी स्क्वॉश
2 भारताच्या पुरुष संघासाठी सोपा पेपर
3 उदरनिर्वाहासाठी माजी क्रिकेटपटू ख्रिस केर्न्सवर बस डेपो साफ करण्याची पाळी!
Just Now!
X