२३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान इराणच्या गोरगान शहरात खेळवल्या जाणाऱ्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत क्रीडाप्रेमींना भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार अनुभवता येणार आहे. या स्पर्धेत १० संघ भाग घेणार असून, भारताचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. या गटात भारताला पाकिस्तानविरुद्ध दोन हात करावे लागणार आहेत.

अशी असेल पुरुष खेळाडूंसाठी स्पर्धेतली गटवारी –

अ गट – भारत, पाकिस्तान, जपान, इराक, अफगाणिस्तान
ब गट – इराण, दक्षिण कोरिया, श्रीलंका, थायलंड, तुर्कमेनिस्तान

महिला खेळाडूंसाठी स्पर्धेतली गटवारी –

अ गट – भारत, थायलंड, दक्षिण कोरिया, चीन तैपेई, तुर्कमेनिस्तान
ब गट – इराण, श्रीलंका, जपान, इराक, पाकिस्तान

या स्पर्धेचं अंतिम वेळापत्रक अजुनही जाहीर करण्यात आलेलं नाहीये. या स्पर्धेसाठी भारताने आपला संघ जाहीर केला असून इराण आणि पाकिस्तान यांच्याकडून भारताला कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहेत.

कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताचा पुरुष संघ

अजय ठाकूर (कर्णधार), दिपक निवास हुडा, महेंद्रसिंह ढाका, मणिंदर सिंह, मोहीत छिल्लर, नितीन तोमर, प्रदीप नरवाल, राहुल चौधरी, रोहीत कुमार, सचिन, संदीप नरवाल, सुरींदर नाडा, सुरजीत, विशाल भारद्वाज

कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय महिलांचा संघ –

अभिलाषा म्हात्रे (कर्णधार), कांचनज्योती दीक्षित, कविता, मनप्रीत कौर, मारिया मोनिका, पायल चौधरी, प्रियांका, प्रियांका नेगी, रणदीप कौर खेरा, रितु, साक्षी कुमारी, सायली जाधव, शमा परवीन, सोनिया