20 February 2019

News Flash

पॅरा आशियाई खेळ : शरद कुमारची उंच उडी सुवर्णपदकावर

शरदने पूर्वीचे सर्व विक्रम काढले मोडीत

शरद कुमार (संग्रहीत छायाचित्र)

जकार्ता येथे सुरु असलेल्या पॅरा आशियाई खेळांमध्ये शरद कुमारने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या 26 वर्षीय शरद कुमारने सर्व विक्रम मोडीत काढत 1.90 मी. लांब ऊडी मारली. या कामगिरीसह शरद कुमारने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. मुळचा बिहारचा असलेल्या शरदला वयाच्या दुसऱ्या वर्षी अर्धांगवायूचा झटका आला होता, यामध्ये त्याचा डावा पाय लुळा पडला. अशा परिस्थितीतही शरदने सर्व अडचणींवर मात करत या क्रीडा प्रकारात आपलं नाव मोठं केलं आहे. याच प्रकारात भारताच्या वरुण भाटीने रौप्य तर थंगवेलु मरिय्यपनने कांस्यपदकाची कमाई केली.

First Published on October 11, 2018 7:34 pm

Web Title: asian para games sharad kumar smashes continental record for gold in mens high jump