06 December 2019

News Flash

झिलीने भारताचे पदकांचे खाते उघडले!

भारताच्या जेरेमीची दमदार कामगिरी

भारताच्या झिली दालाबेहेराने आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचे पदकांचे खाते उघडले. झिलीने ४५ किलो वजनी गटात भारताला रौप्यपदक मिळवून दिले. मात्र माजी विश्वविजेत्या मिराबाई चानूचे ४९ किलो वजनी गटातील कांस्यपदक तांत्रिक नियमामुळे थोडक्यात हुकले.

कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या झिलीने या स्पर्धेतदेखील दमदार कामगिरीची नोंद केली. झिलीने स्नॅचमध्ये ७१ किलो तर क्लिन अँड जर्क प्रकारात ९१ किलो असे एकूण १६२ किलो वजन उचलत दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. व्हिएतनामच्या व्योंग थी हुयेनने १६८ किलो (७६ किलो स्नॅच आणि ९१ किलो क्लिन अँड जर्क) वजन उचलत सुवर्णपदक तर फिलिपाइन्सच्या मेरी फ्लोर दियाजने १५८ किलो (६९ किलो स्नॅच आणि ८९ किलो क्लिन अँड जर्क) वजन उचलत कांस्यपदक पटकावले.

भारताच्या जेरेमीची दमदार कामगिरी

युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील १६ वर्षीय सुवर्णपदक विजेता भारताचा जेरेमी लालरिनुंगाने त्याच्या ६७ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये १३४ किलो तर क्लिन अँड जर्कमध्ये १६३ किलो असे एकूण २९७ किलो वजन उचलून दमदार कामगिरीची नोंद केली आहे. या ब-गटात जेरेमीपेक्षा केवळ पाकिस्तानचा तल्हा तालिबने ३०४ किलो (स्नॅच १४० किलो आणि क्लिन अँड जर्क १६४ किलो ) वजन उचलले आहे. आता अ-गटातील स्पर्धक सोमवारी खेळणार असून या दोघांपेक्षा कुणी अधिक वजन उचलले नाही तर भारताच्या जेरेमीचे किमान रौप्यपदक निश्चित होऊ शकणार आहे.

First Published on April 22, 2019 1:42 am

Web Title: asian weightlifting competition
Just Now!
X