News Flash

आसामच्या क्रिकेटपटूचा विक्रम, एकाच डावात घेतले १० बळी

स्थानिक स्पर्धेत केला विक्रम

आसामचा क्रिकेटपटू अर्पण दत्ताने स्थानिक क्रिकेट स्पर्धेत एकाच डावात १० बळी घेण्याचा विक्रम केला आहे. आसाम क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नरुद्दीन अहमद चषक स्पर्धेत अर्पणने शिवसागर संघाकडून खेळत असताना अर्पणने Charaideo संघाविरुद्ध ही कामगिरी केली. अर्पणने १९ षटकं टाकून ४८ धावांच्या बदल्यात संपूर्ण संघ माघारी धाडला.

अर्पणच्या गोलंदाजीच्या जोरावर शिवसागर संघाने Charaideo संघाचा डाव १२१ धावांमध्ये संपवला. हा सामना अनिर्णित राहिला असला तरीही शिवसागर संघाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर महत्वाचे गुण मिळवले आहेत. अर्पणला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 10:22 am

Web Title: assam cricketer takes 10 wickets in an innings psd 91
Next Stories
1 शास्त्री गुरुजींना BCCI कडून बक्षीस, प्रशिक्षकपदावर मुदतवाढ
2 आज षटकारांचा वर्षांव?
3 भारताविरुद्धचा तणावपूर्ण सामना पाकिस्तानसाठी जिंकणे अत्यावश्यक!
Just Now!
X