जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धा

एआयबीए महिला युवा जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पध्रेचा दुसरा दिवस भारतीयांसाठी संमिश्र राहिला. आस्था पाहवाने ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. राष्ट्रीय विजेती शशी चोप्राने (५७ किलो) उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर वनलाल्हरीआत्पुईचे (६० किलो) आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.

आस्थाची पहिल्याच फेरीतील लढत ही उपउपांत्यपूर्व फेरीची होती आणि त्यात तिने बल्गेरियाच्या मेलिस योनूझोव्हावर सहज विजय मिळवला. शशीने उझबेकिस्तानच्या दुडरेनाखोन रखमाटोव्हावर सहज विजय मिळवला.

मात्र वनलाल्हरीआत्पुईला दक्षिण कोरियाच्या इम ऐजीकडून पराभव पत्करावा लागला. बाल्कन युवा आंतरराष्ट्रीय स्पध्रेतील सुवर्णपदक विजेत्या शशीला पुढील फेरीत चीन तैपेईच्या लीन ली वेई-यीचा सामना करावा लागणार आहे.