News Flash

अ‍ॅथलेटिक्स : दोन पदकांची शाश्वती?

१९००मध्ये भारताने प्रथमच ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला.

यंदाच्या ऑलिम्पिकसाठी तब्बल २६ अ‍ॅथलेटिक्सपटूंचा चमू भारताने टोक्योला धाडला आहे. गेल्या काही वर्षांत राष्ट्रकुल, आशियाई यांसारख्या क्रीडा स्पर्धांत भारताने अ‍ॅथलेटिक्समध्ये धवल यश मिळवले आहे. भालाफेक, गोळाफेक आणि धावण्याच्या शर्यतीतील विविध प्रकारांत भारताने तगडी फौज उतरवली असल्याने या वेळी किमान दोन पदकांची अपेक्षा नक्कीच बाळगता येऊ शकते.

इतिहास

१९००मध्ये भारताने प्रथमच ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला. त्या वेळी अ‍ॅथलेटिक्समध्येच भारताने पहिलेवाहिले ऑलिम्पिक पदक जिंकले. नॉर्मन प्रिचर्ड यांनी देशासाठी अनुक्रमे २०० मीटर धावण्याच्या आणि अडथळ्यांच्या शर्यतीत रौप्यपदके जिंकली. १९०५मध्ये प्रिचर्ड यांनी ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारले असले, तरी त्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र दुर्दैवाने प्रिचर्ड यांच्या पराक्रमानंतर १२१ वर्षे उलटली तरी भारताला या क्रीडाप्रकारात किमान एक कांस्यपदकही मिळवता आलेले नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताने मिल्खा सिंग, पी. टी. उषा यांसारखे महान अ‍ॅथलेटिक्सपटू घडवले. मिल्खा यांना १९६०, तर उषा यांना १९८४च्या ऑलिम्पिकमध्ये पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. मागील ऑलिम्पिकमध्ये ललिता बाबरने ३००० मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. एकंदरीतच ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अ‍ॅथलेटिक्सपटूंकडून निराशाजनक कामगिरीच पाहायला मिळाली आहे.  त्यामुळे यंदा तरी अ‍ॅथलेटिक्समधील पदकांचा दुष्काळ संपेल, अशी आशा आहे.

आतापर्यंतची पदके

सुवर्ण ० रौप्य २ कांस्य ० एकूण २

पदकविजेता

’ (१९००, पॅरिस) दोन रौप्यपदके

२०० मीटर धावण्याची आणि

२०० मीटर अडथळ्यांची शर्यत

अपेक्षा

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या आशा स्टीपलचेसपटू अविनाश साबळेवर असतील. त्याशिवाय गेल्या काही वर्षांत भालाफेकीत एकामागून एक यशाची शिखरे सर करणारा नीरज चोप्रा याच्याकडून पदकाची आशा नक्कीच बाळगता येईल. हिमा दासच्या अनुपस्थितीत महिलांमध्ये द्युती चंदच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. याप्रमाणेच भारताचे रिलेमधील दोन्ही संघही उत्तम लयीत आहेत.

भारतीय क्रीडापटू

’ नीरज चोप्रा, शिवपाल सिंग (भालाफेक), अविनाश साबळे (३००० मीटर स्टीपलचेस), एम. पी. जबीर (४०० मीटर अडथळ्यांची शर्यत), मुरली श्रीशंकर (लांब उडी), तजिंदरपाल सिंग तूर (गोळाफेक), केटी इरफान, संदीप कुमार, राहुल रोहिला (२० मीटर चालण्याची शर्यत), गुरप्रीत सिंग, (५० मीटर चालण्याची शर्यत), अमोज जेकब, अरोकिआ राजीव, मोहम्मद अनास, नागनाथन पंडी, नोह निर्मल तोम (४ बाय ४०० मीटर रिले), सार्थक भांब्री, अ‍ॅलेक्स अन्थोनी (४ बाय ४०० मीटर मिश्र रिले)

’ महिला : एम. सी. मेरी कोम (५१ किलो), सिमरनजीत कौर (६० किलो), लोव्हलिना बोर्गोहेन (६९ किलो), पूजा राणी (७५ किलो)

जोकोव्हिचचे टोक्योनगरीत आगमन

’  जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच याचे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी टोक्योनगरीत आगमन झाले. ‘‘ऑलिम्पिकमध्ये सर्बियाचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटत आहे,’’ असे ३४ वर्षीय जोकोव्हिचने म्हटले होते. जोकोव्हिचने ऑलिम्पिक आणि अमेरिकन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले तर मोसमातील चारही ग्रँडस्लॅम आणि ऑलिम्पिकचे सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला टेनिसपटू ठरणार आहे. रॉजर फेडरर, राफेल नदाल, डॉमिनिक थिम आणि निक किर्गिस हे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 2:11 am

Web Title: athletic guarantee of two medals olympics akp 94
Next Stories
1 ऑलिम्पिकमध्ये करोनाचा धोका अपरिहार्य; ‘डब्ल्यूएचओ’चा इशारा
2 मल्लखांबाची ऑलिम्पिक प्रात्यक्षिके अडचणीत
3 भारताचा सराव सामना : हसीब हमीदची शतकी खेळी
Just Now!
X