अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेत वयाने अधिक असलेले खेळाडू खेळविल्याप्रकरणी भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने कारवाई करीत दिल्ली आणि हरयाणासहित सहा राज्यांवर वर्षभरासाठी बंदी घातली आहे. याचप्रमाणे उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी १४ खेळाडूंना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या नुकत्याच झालेल्या दोन दिवसाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
‘‘२२ आणि २३ डिसेंबरला झालेल्या भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत वयाने अधिक असलेल्या खेळाडूंचा सहभाग आणि उत्तेजक पदार्थाच्या सेवनाची प्रकरणे हे विषय गांभीर्याने चर्चेत आले. त्यानुसार सहा राज्यांवर बंदी आणि १४ खेळाडूंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली,’’ असे भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने पत्रकात म्हटले आहे. विविध वयोगटाच्या स्पर्धामध्ये या वर्षी एकंदर ४४ खेळाडू अधिक वयाचे असल्याचे सिद्ध झाले. या खेळाडूंवर दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.