21 September 2020

News Flash

कोलकाताचा मुंबईवर विजय

सूरमयी उद्घाटन सोहळ्यानंतर घरच्या मैदानावर अ‍ॅटलेटिको डी कोलकाता संघाने इंडियन सुपर लीग स्पर्धेत मुंबई सिटी एफसीवर ३-० असा विजय मिळवला.

| October 13, 2014 02:51 am

सूरमयी उद्घाटन सोहळ्यानंतर घरच्या मैदानावर अ‍ॅटलेटिको डी कोलकाता संघाने इंडियन सुपर लीग स्पर्धेत मुंबई सिटी एफसीवर ३-० असा विजय मिळवला. फिकरू टेफेराने २७व्या मिनिटाला सुरेख गोल करत अ‍ॅटलेटिकोचे खाते उघडले. यानंतर मात्र अ‍ॅटलेटिकोचा खेळ मंदावला. दुसऱ्या सत्रात बोर्जा फर्नाडिझने व्हॉलीद्वारे गोल करत अ‍ॅटलेटिकोला आघाडी मिळवून दिली. ९३व्या मिनिटाला अर्नल लिलबर्टने फिकरूच्या क्रॉसवर अफलातून गोल करत अ‍ॅटलेटिकोच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अ‍ॅटलेटिकोने शॉर्ट पासिंग तर मुंबईने मोठय़ा पासेसवर भर देत ७०,००० प्रेक्षकांना दर्जेदार फुटबॉलची अनुभूती दिली. मुंबईचा कर्णधार सय्यद रहीम नबीला सामना सुरु झाल्यावर लगेचच पिवळे कार्ड दाखवण्यात आले. तसेच पहिल्याच सत्रात नबीच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. या दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्याने दुसऱ्या लढतीतील त्याच्या सहभागाविषयी साशंकता व्यक्त करण्यात आहे. कर्णधारच दुखापतग्रस्त झाल्याने मुंबईचे आव्हान कमकुवत झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 2:51 am

Web Title: atk begin isl in super fashion beat mumbai city fc 3 0
टॅग Isl
Next Stories
1 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत-द. आफ्रिकामध्ये रंगेल!
2 महाराष्ट्राला दुहेरी मुकुट
3 पीटरसनचा आत्मचरित्रामध्ये ‘गुरू’ द्रविडला कुर्निसात
Just Now!
X