News Flash

अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट स्टेडियममध्ये स्फोट

८ ठार आणि ४५ जण जखमी

८ ठार आणि ४५ जण जखमी

नांगरहार प्रांतातील एका क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या स्फोटांच्या मालिकेत किमान आठ जण ठार झाले.जलालाबाद भागात शुक्रवारी रात्री स्टेडियममध्ये झालेल्या काही स्फोटांमध्ये ४५ जण जखमी झाल्याची माहिती नांगरहार प्रांताच्या राज्यपालांचे प्रवक्ते अताहुल्ला खोगयानी यांनी दिली. सामना चालू असताना हे स्फोट घडवण्यात आले. या दहशतवादी हल्ल्याची चौकशी सुरू आहे, असे खोगयानी यांनी सांगितले. सध्या तरी या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही अतिरेकी संघटनेने घेतलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 1:59 am

Web Title: attack on cricket match in afghanistan kills at least 8
Next Stories
1 अंतिम फेरीची रंगीत तालीम!
2 कोलकातासाठी विजय अनिवार्य!
3 राजस्थान-बेंगळूरु यांच्यात कडवी झुंज
Just Now!
X