News Flash

दीपिकाकडे लक्ष

आतापर्यंतचा इतिहास जरी प्रतिकू ल असला तरी ऑलिम्पिकपूर्व स्पर्धामधील दिमाखदार कामगिरी भारतीय तिरंदाजांच्या आशा उंचावतात.

टोक्यो : आतापर्यंतचा इतिहास जरी प्रतिकूल असला तरी ऑलिम्पिकपूर्व स्पर्धामधील दिमाखदार कामगिरी भारतीय तिरंदाजांच्या आशा उंचावतात. शुक्रवारी भारतीय तिरंदाजांच्या ऑलिम्पिक अध्यायाला क्रमवारी फेरीने प्रारंभ होणार आहे.

भारताचा महिला संघ ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरला असला, तरी दीपिका कुमारी, अतानू दास, तरुणदीप रॉय आणि प्रवीण जाधव या चौघांकडून देशाला तिरंदाजातील पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याच्या आशा आहेत. पॅरिस येथील विश्वचषक स्पर्धा गाजवणाऱ्या दीपिका-अतानू या दाम्पत्याकडून मिश्र दुहेरी स्पध्रेत पदकाच्या कमाईची अपेक्षा आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच समावेश करण्यात आलेल्या मिश्र दुहेरी स्पध्रेला शनिवारी युमेनोशिमा पार्क येथे प्रारंभ होईल.

१९८८ पासून भारताने लिंबा राम, डोला बॅनर्जी यांच्यासारखे अनेक दर्जेदार तिरंदाज घडवले आहेत. परंतु ऑलिम्पिकच्या यशापर्यंत भारताची मजल पोहोचू शकली नाही. जयंत तालुकदारने २००६मध्ये जागतिक क्रमवारीतील द्वितीय स्थान पटकावले, तर डोलाने २००७मध्ये विश्वविजेतेपद प्राप्त केले. पण २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ते पदकाची किमया दाखवू शकले नाहीत.

२००९मध्ये युवा विश्वचषक स्पर्धेत १५व्या वर्षी विजेतेपद पटकावणाऱ्या दीपिकाने मग २०१०च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदके कमावली. परंतु २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ आपला प्रभाव दाखवू शकला नाही. मग पुढील चार वर्षांनी रिओमध्येही भारताने तोच कित्ता गिरवला. कारकीर्दीतील तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान नावावर असणाऱ्या दीपिकाला तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले. परंतु गेल्या पाच वर्षांत रांचीच्या दीपिकाची कामगिरी कमालीची सुधारली आहे. पाच विश्वचषक पदके तिच्या नावावर आहेत.

२०१२नंतर प्रथमच पात्र ठरलेल्या भारताच्या पुरुष संघाकडूनही मोठय़ा अपेक्षा आहेत. तरुणदीप, अतानू आणि प्रवीण यांनी २०१९च्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत रुपेरी यश मिळवले होते. तरुणदीपचे हे तिसरे ऑलिम्पिक आहे, तर अतानू दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करीत आहे.

’  सकाळी ५.३० वा.

महिला एकेरी क्रमवारी फेरी

(दीपिका कुमारी)

’  सकाळी ९.३० वा.

पुरुष एकेरी क्रमवारी फेरी

(अतानू दास, तरुणदीप रॉय,

प्रवीण जाधव)

ऑलिम्पिक तिरंदाजीत आतापर्यंत भारताला पदक जिंकता आलेले नाही. त्यामुळेच माझ्यासाठी, माझ्या तिरंदाजी संघासाठी आणि देशासाठी हे ऑलिम्पिक अत्यंत महत्त्वाचे आहे.

– दीपिका कुमारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 3:04 am

Web Title: attention to deepika kumari tokyo olympics ssh 93
Next Stories
1 ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यातून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश
2 उद्घाटनासाठी भारताचे फक्त २८ जणांचे पथक
3 भारतीय संघात बदल अपेक्षित?
Just Now!
X