मुकुंदवाडी भागातील रामनगर परिसरातील रहिवासी असलेल्या युवा हॉकीपटू सख्ख्या भावंडांचा लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगावानजीकच्या तलावात बुडून सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. भावंडांपैकी एकाचा मृतदेह मंगळवारी सकाळी हाती लागल्यानंतर दोघांवरही आजोळ असलेल्या टाकळगावातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

रोहन रामभाऊ वडमारे (वय २१) व रोहित रामभाऊ वडमारे (वय १७) अशी मृत भावंडांची नावे आहेत. दोघेही उत्तम आणि राष्ट्रीय, राज्य पातळीवर चमकदार कामगिरी केलेले हॉकीपटू होते, असे त्यांचे प्रशिक्षक श्यामसुंदर भालेराव यांनी सांगितले.

रोहन, रोहितसह त्यांच्या प्रियंका आणि प्रीती या बहिणीही हॉकीपटू होत्या. यातील मोठय़ा बहिणीने सहा वेळा राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली होती.