हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यर यांनी मधल्या फळीत केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून मात केली. या विजयासह भारताने ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. हार्दिक आणि श्रेयस यांनी अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे सामन्याचं चित्रच बदललं.
१८ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू झॅम्पाच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने पुढे येऊन तब्बल १११ मीटर लांबीचा षटकार खेचला. श्रेयसचा हा षटकार पाहून ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या भारतीय सहकाऱ्यांची आणि विशेषकरुन विराट कोहलीची रिअॅक्शन ही पाहण्यासारखी होती. श्रेयसचा षटकार पाहून विराटही अचंबित झाला. पाहा हा व्हिडीओ…
ICYMI: #SkipperShreyas' no-look SIX on his birthday, that made our day, week and month #AUSvINDpic.twitter.com/7E6Kkyk8QA
— Delhi Capitals (@DelhiCapitals) December 6, 2020
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत अपयशी ठरल्यानंतर श्रेयस अय्यरला पहिल्या टी-२० सामन्यात संधी मिळाली नव्हती. मात्र मनिष पांडेला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या टी-२० सामन्यात अय्यरला संधी देण्यात आली. दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रेयसला फलंदाजीची संधी उशीरा मिळाली असली तरीही त्याने ५ चेंडूत १ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने नाबाद १२ धावा केल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 7, 2020 2:03 pm