19 September 2020

News Flash

IND vs AUS 3rd Test Live : दुसऱ्या डावातही विहारी अपयशी; भारताला पहिला धक्का

IND vs AUS 3rd Test Day 3 Live updates

IND vs AUS 3rd Test Day 3 Live : बुमराहाच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी स्पशेल लोटांगण घातले. बुमराहाने सहा बळी घेत ऑस्ट्रेलियाला १५१ धावांत गारद केले. बॉग्सिंग डेचा तिसरा दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. बुमराहाने सहा बळी घेतले. तर जाडेजा २ आणि इशांत आणि शामीने प्रत्येकी एक-एक बळी घेत बुमराहाला चांगली साथ दिली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया अद्याप २९२ धावांनी पिछाडीवर आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यावर आतापर्यंत भारतीय संघाने वर्चस्व राखले आहे. फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने कालच्या बिनबाद ८ धावासंखेवरून आज खेळाला सुरूवात केली.  उपहारापर्यंत त्यांची अवस्था ४ बाद ८९ अशी झाली. पहिल्या सत्रात सलामीवीर फिंच ८ धावांवर माघारी परतला. पाठोपाठ हॅरिस २२ तर ख्वाजा २१ धावा करून तंबूत परतले. शॉन मार्श आणि ट्रेव्हिस हेड यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण उपहाराच्या विश्रांतीआधी शेवटच्या चेंडूवर मार्श १९ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पेनने सर्वाधिक धावसंख्या केली. पेनने २२ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावाता आले नाही.

त्याआधी भारताने पहिला डाव ७ बाद ४४३ धावांवर घोषित केला. भारताचा नवोदित सलामीवीर मयंक अग्रवाल याने ७६ धावांची खेळी करून भारताच्या डावाचा पाया रचला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताचा अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा (१०६) आणि कर्णधार विराट कोहली (८२) यांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने मोठी धावसंख्या उभारली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने एकही गडी न गमावता २ बाद २७७ धावांपर्यंत मजल मारली होती. विराट कोहली आणि पुजारा बाद झाल्यानंतर मुंबईकर रहाणे-रोहित जोडीने मोर्चा सांभाळला. रहाणे (३४) बाद झाल्यानंतर रोहितने पंतच्या साथीने धावसंख्या ४०० पार पोहचवली. अखेर पंत ३९ धावांवर बाद झाला. पंतनंतर खेळपट्टीवर आलेला जाडेजाही लगेच माघारी परतला. पण कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या मुंबईकर रोहित शर्माने (६३*) अर्धशतकी खेळी करून चाहत्यांना खूश केले.

लोकसत्ता समालोचन

Live Blog

11:23 (IST)28 Dec 2018
दुसऱ्या डावातही विहारी अपयशी; भारताला पहिला धक्का

दुसऱ्या डावातही विहारी अपयशी; भारताला पहिला धक्का

10:18 (IST)28 Dec 2018
१५१ धावांत ऑस्ट्रेलिया गारद

बुमराहच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १५१ धावांत संपुष्टात आला आहे. बुमराहाने सहा बळी घेतले.

10:16 (IST)28 Dec 2018
बुमराहाचा भेदक मारा, ऑस्ट्रेेलियाचे ९ गडी बाद

१५१ धावांत ऑस्ट्रेलियाचे ९ गडी बाद झाले आहेत. बुमराहाने  ५ कांगारूंची शिकार केली. 

10:10 (IST)28 Dec 2018
ऑस्ट्रेलियाला ८ वा धक्का, पेन बाद

बुमराहाच्या वेगवान माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी लोटांगन घेतलं आहे. ऑस्ट्रेलियाला ८ वा धक्का बसला आहे. कर्णधार पेनला बुमराहाने बाद केले. १४७ धावांवर ऑस्ट्रेलियाचे ८ गडी बाद झाले आहेत. 

09:50 (IST)28 Dec 2018
चहापानापर्यंत ऑस्ट्रेलिया ७ बाद १४५ धावा

चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने सात गड्यांच्या मोबदल्यात १४५ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया अद्याप  २९८ धावांनी पिछाडीवर आहे. 

09:33 (IST)28 Dec 2018
ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का, पॅट कमिन्स बाद

ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला आहे. मोहमद्द शामीने पॅट कमिन्सला बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या सात बाद १३८ धावा झाल्या आहेत. कर्णधार पेन अद्याप मैदानावर आहे.  

08:27 (IST)28 Dec 2018
ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का

भारतीय गोलंदाजापुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या आहेत.  रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचा सहावा गडी बाद झाला आहे. जाडेजाने मार्शला बाद केले. ऑस्ट्रेलिया्या सहा बाद १०५ धावा झाल्या आहेत.

08:13 (IST)28 Dec 2018
ऑस्ट्रेलियाचे शतक

यजमान ऑस्ट्रेलियाने ५ गड्यांच्या मोबदल्यात १०० धावा केल्या आहेत. भारताने दिलेल्या ४४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कांगारूंची चांगलीच दमछाक उडाली आहे. बुमराहच्या वेगवान माऱ्यापुढे १०० धावांच्या आतच अर्धा संघ बाद झाला आहे. ऑस्ट्रेलिया अद्याप ३४२ धावांनी पिछाडीवर आहे.

07:56 (IST)28 Dec 2018
ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत

बुमराहाचा भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली आहे. ९२ धावांत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. बुमराहने ९२ धावांवर हेडला बाद केले. बुमराहचा हा तिसरा बळी होता.

07:02 (IST)28 Dec 2018
शॉन मार्श पायचीत; उपहारापर्यंत ऑस्ट्रेलिया ४ बाद ८९

शॉन मार्श पायचीत; उपहारापर्यंत ऑस्ट्रेलिया ४ बाद ८९

06:12 (IST)28 Dec 2018
उस्मान ख्वाजा झेलबाद, ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का

फिरकीपटू रवींद्र जाडेजा याच्या गोलंदाजीवर बचावत्मक फटका खेळताना उस्मान ख्वाजा झेलबाद झाला. ३ चौकार लगावत २१ धावा करणाऱ्या ख्वाजाच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला.

05:42 (IST)28 Dec 2018
फिंच पाठोपाठ हॅरिस माघारी; ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का

फिंच पाठोपाठ मार्कस हॅरिसनेही तंबूचा रस्ता धरला आणि ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला. चांगली सुरुवात मिळाल्यानंतर हॅरिस २२ धावांवर बाद झाला. बुमराहच्या उसळत्या चेंडूवर त्याने पूल शॉट खेळला आणि सीमारेषेवर तो झेलबाद झाला.

05:34 (IST)28 Dec 2018
फिंच झेलबाद, ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का

दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आणि ऑस्ट्रेलियाने आपला पहिला गडी गमावला. अनुभवी सलामीवीर फिंच ८ धावा करून माघारी परतला.

Next Stories
1 स्मिथ, बँक्रॉफ्ट यांच्या वक्तव्यामुळे आश्चर्य -पाँटिंग
2 मनू भाकरची दुहेरी चमक
3 ठाकूर, देशपांडेचे मुंबईच्या रणजी संघामध्ये पुनरागमन
Just Now!
X