08 July 2020

News Flash

श्रीलंकेविरूद्ध वॉर्नरची अनोखी ‘हॅटट्रिक’; विराटच्या विक्रमाशी बरोबरी

श्रीलंकेला टी २० मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून व्हाईटवॉश

श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी २० मालिकेत ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला ३-० असे पराभूत केले. ऑस्ट्रेलियाकडून संपूर्ण मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला सामनावीर आणि मालिकावीर असा दुहेरी सन्मान मिळाला. वॉर्नर तीनही टी २० सामन्यात नाबाद राहिला. तिसर्‍या आणि अंतिम मॅचमध्ये त्याने नाबाद ५७ धावा केल्या आणि संघाला ७ गडी राखून विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. तिसऱ्या सामन्यात नाबाद अर्धशतकाच्या जोरावर वॉर्नरने टी २० क्रिकेटमध्ये विक्रमांची नोंद केली.

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यात वॉर्नरने ३७ धावा करत टी २० क्रिकेटमध्ये आपला ९,००० धावांचा पूर्ण केला. याबरोबर त्याने या सामन्यात ४९ धावा केल्या त्यावेळी त्याने आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये २,००० धावांचा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये २,००० धावा करणारा वॉर्नर हा पहिला फलंदाज ठरला. वॉर्नरने ७३ सामन्यात २,००० धावांचा टप्पा गाठला. कर्णधार आरॉन फिंच ५५ सामन्यात १,७७२ धावांसह दुसर्‍या स्थानी आहे.

वॉर्नरने या मालिकेत तीन अर्धशतके ठोकली. तीनही सामन्यात नाबाद रहात ५० पेक्षा जास्त धावा केल्या. पहिल्या सामन्यात त्याने नाबाद १०० धावा केल्या. दुसर्‍या सामन्यात त्याने नाबाद ६० धावा केल्या. तर तिसऱ्या सामन्यात वॉर्नरने तिसऱ्या सामन्यात नाबाद ५७ धावा केल्या. यासह कोणत्याही उभय देशांच्या टी २० आंतरराष्ट्रीय मालिकेत ३ किंवा त्याहून अधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारा तो जगातील तिसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी हा पराक्रम भारतीय कर्णधार विराट कोहली आणि कॉलिन मुनरो यांनी केला होता. २०१५-१६ मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर कोहलीने नाबाद ९०, ५९ आणि ५० धावा केल्या होत्या.

याशिवाय, श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात वॉर्नरने आंतरराष्ट्रीय टी २० कारकीर्दीमधील १६ वे अर्धशतक झळकावले. बंदीनंतरची ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय टी २० मालिका होती. तो त्यात पूर्णपणे यशस्वी ठरवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2019 12:17 pm

Web Title: aus vs sl australia vs sri lanka david warner 3 consecutive half centuries equals virat kohli record t20 cricket vjb 91
Next Stories
1 अटीतटीच्या लढतीत विंडीजची बाजी, भारतीय महिला संघ एका धावाने पराभूत
2 Video : असली कसली फलंदाजी? चेंडू खेळताना गोलंदाजालाच दाखवली पाठ
3 शतकवीर शुभमनने केला कोणालाही न जमलेला विक्रम
Just Now!
X