13 August 2020

News Flash

विक्रमाला तिलांजली देत ह्य़ुजेसला आदरांजली

व्हिक्टोरियाच्या फलंदाजाने वैयक्तिक विक्रमाला तिलांजली देत फिलीप ह्य़ुजेसला आदरांजली वाहिली आहे.

| December 2, 2014 12:05 pm

क्रिकेटवर  शोककळा
व्हिक्टोरियाच्या फलंदाजाने वैयक्तिक विक्रमाला तिलांजली देत फिलीप ह्य़ुजेसला आदरांजली वाहिली आहे. ‘द कुरिअर मेल वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, शॉन मॅकऑर्थर एका दुर्मीळ विक्रमाच्या उंबरठय़ावर होता. मात्र तो ज्या धावसंख्येवर खेळत होता ती ह्य़ुजेसशी संलग्न असल्याने त्याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. हॅडन क्लबचे नेतृत्व करणारा मॅकऑर्थर व्हीआरए डेलाकोंब संघाविरुद्ध २२० धावांवर खेळत होता. त्या वेळी हॅडन क्लबच्या ४०८ धावा झाल्या होत्या आणि ६३ षटकांचा खेळ झाला होता. क्लबतर्फे सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडण्यासाठी मॅकऑर्थरला केवळ अकरा धावांची आवश्यकता होती. मात्र ह्य़ूजेसचा कसोटी क्रमांक ४०८ आहे तर फिलीप ६३ धावांवर खेळत असतानाच दुर्दैवी अपघात झाला होता. ह्य़ूजेसच्या संदर्भातील या आकडय़ांचा गौरव करण्यासाठी मॅकऑर्थरने विक्रमाची पर्वा न करता डाव घोषित केला. त्याच्या या निर्णयाने संघसहकारी चकित झाले, मात्र धावफलक पाहताच मॅकऑर्थरच्या निवृत्तीमागचे कारण त्यांच्या लक्षात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2014 12:05 pm

Web Title: aussie club batsman sacrifices record for hughes tribut
Next Stories
1 ह्य़ुजेसवरील अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण
2 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : सराव सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियाशी गाठ
3 डेव्हिड बेकहॅमच्या गाडीला अपघात
Just Now!
X