News Flash

ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा दणदणीत विजय

भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने भारतीय ‘अ’ संघावर १० विकेट्सने दमदार विजय मिळवला.

| August 2, 2015 02:19 am

भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने भारतीय ‘अ’ संघावर १० विकेट्सने दमदार विजय मिळवला. भारताचा दुसरा डाव २७४ धावांमध्ये आटोपल्यावर विजयासाठी आवश्यक ६१ धावा ऑस्ट्रेलियाने एकही फलंदाज न गमावता पूर्ण केल्या. दोन चारदिवसीय सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने १-० अशी खिशात टाकली आहे.
६ बाद २६७ धावांनी दिवस सुरू करताना भारतीय संघाने अवघ्या सात धावांमध्ये चार फलंदाज गमावले. गुरिंदर संधूने श्रेयस गोपाल (०), वरुण आरोन (१) आणि बाबा अपराजित (३०) या तिन्ही फलंदाजांना बाद केले. तर डावखुरा फिरकीपटू स्टीव्ह ओ’किफेने शार्दूल ठाकूरला (४) बाद करत भारताचा डाव संपुष्टात आणला.
विजयासाठी आवश्यक असलेल्या ६१ धावा ऑस्ट्रेलियाने सहज पूर्ण केल्या. पहिल्या डावात दीड शतक झळकावलेला कॅमेरून बॅनक्रॉफ्ट (नाबाद २१) आणि कर्णधार उस्मान ख्वाजा (नाबाद ४१) यांनी ६.१ षटकांमध्ये जलदगतीने धावा जमवत
संघाला मोठा विजय सहजपणे मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक
भारत ‘अ’ (पहिला डाव) : १३५
ऑस्ट्रेलिया ‘अ’ (पहिला डाव) : ३४९
भारत ‘अ’ (दुसरा डाव) : ८८.३ षटकांत सर्व बाद २७४ (अभिनव मुकुंद ५९; गुरिंदर संधू ४/७६).
ऑस्ट्रेलिया ‘ब’ (दुसरा डाव) : ६.१ षटकांत बिन बाद ६२ (कॅमेरून बॅनक्रॉफ्ट नाबाद २१, उस्मान ख्वाजा नाबाद ४१).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 2:19 am

Web Title: australia a team victory
टॅग : Australia,Victory
Next Stories
1 शाहरुखपुढे एमसीएचे लोटांगण
2 चेक प्रजासत्ताकविरुद्ध भारताला चमत्काराची आवश्यकता -भूपती
3 आता लक्ष्य ग्रँडमास्टर किताब
Just Now!
X