सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि जो बर्न्‍स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने ९ विकेट्स राखून तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघावर विजय मिळवला.
आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेचा संघ १ बाद १०२ अशा सुस्थितीत होता. मात्र त्यानंतर अवघ्या ६९ धावांत त्यांनी उर्वरित फलंदाज गमावले. नॅथन कोल्टर नीलने ३१ धावा देत ३ बळी टिपले. प्रत्युत्तरादाखल ख्वाजाने ८२ चेंडूंत ७३ धावा केल्या, तर बर्न्‍सने ९१ चेंडूंत नाबाद ६३ धावांची खेळी केली. या दोघांची १४२ धावांची भागीदारी हार्डस व्हिलजोन याने ख्वाजाला बाद करून तोडली. त्यानंतर ट्रॅव्हिस हेडने नाबाद २७ धावा करताना ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला.