कर्णधार उस्मान ख्वाजा (१००) व जो बर्न्‍स (१४५) यांची शैलीदार शतकांच्या जोरावर  ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने भारत ‘अ’ संघाविरुद्ध ११९ धावांनी विजय मिळविला. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ४ बाद ३३४ असा धावांचा डोंगर रचला. त्यामध्ये ख्वाजा व बर्न्‍स यांनी २३९ धावांची सलामी दिली. भारत ‘अ’ संघाच्या उन्मुक्त चंद व केदार जाधव यांनी शैलीदार अर्धशतके लगावूनही त्यांचा डाव ४२.३ षटकांत २१५ धावांमध्ये कोसळला. ऑस्ट्रेलियाकडून गुरिंदर संधू व अ‍ॅडम झंपा यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले.
भारताला ३३५ धावांचे आव्हान पेलविले नाही. चंद व जाधव यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज फार वेळ टिकला नाही. चंद याने शैलीदार खेळ करीत ५२ धावा केल्या. केदारने आत्मविश्वासाने खेळ करीत ५० धावा केल्या. मात्र त्यांना अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताकडून एकही मोठी भागीदारी होऊ शकली नाही.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया ‘अ’ ५० षटकांत ४ बाद ३३४ (उस्मान ख्वाजा १००, जो बर्न्‍स १५४, मॅथ्यू वेड नाबाद ३४) वि.वि. भारत ‘अ’ ४२.३ षटकांत सर्वबाद २१५ (उन्मुक्त चंद ५२, केदार जाधव ५०, गुरिंदर संधू ४/२८, अ‍ॅडम झंपा ४/४९).