News Flash

जागतिक हॉकी लीग : ऑस्ट्रेलियाचा यजमानांना दणका

अखेरच्या क्षणाला ख्रिस सिरिएल्लोने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पध्रेचे जेतेपद जिंकून दिले.

| July 7, 2015 12:56 pm

अखेरच्या क्षणाला ख्रिस सिरिएल्लोने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पध्रेचे जेतेपद जिंकून दिले. सिरिएल्लोने ६०व्या मिनिटाला केलेल्या गोलने ऑस्ट्रेलियाने १-० अशा फरकाने यजमान बेल्जियमला पराभूत केले.  बेल्जियमने ऑस्ट्रेलियाला कडवी टक्कर दिली. त्यामुळे  सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये रंगणार असेच चिन्ह दिसत होते; परंतु अखेरच्या क्षणाला ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर सिरिएल्लोने कोणतीही चूक न करता  गोल करून बेल्जियम चाहत्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2015 12:56 pm

Web Title: australia beat belgium 1 0 to win hockey world league semi final
टॅग : World Hockey League
Next Stories
1 महिला हॉकी संघाचे जल्लोषात स्वागत
2 महेंद्रसिंग राजपूत, किशोरी शिंदेचा गौरव
3 विजयपथावर परतण्याचे ध्येय – रहाणे
Just Now!
X