ऑस्ट्रेलियाच्या आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. ३ वन-डे आणि ३ टी-२० अशी ही मालिका रंगणार आहे. ४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत ही मालिका रंगणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या मालिकेचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. ग्लेन मॅक्सवेलने संघात पदार्पण केलं असून दोन नवोदीत खेळाडूंनाही ऑस्ट्रेलियाने संघात जागा दिली आहे.

असा असेल ऑस्ट्रेलियाचा संघ –

अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), सिन अबॉट, अ‍ॅश्टन अ‍ॅगर, अ‍ॅलेक्स केरी, पॅट कमिन्स (उप-कर्णधार), जोश हेजलवूड, मार्नस लाबुशेन, नॅथन लॉयन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, रायले मेर्डीथ, जोश फिलीप, डॅनिअल सम्स, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, अँड्रू टाय, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅडम झॅम्पा

ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक –

पहिला टी-२० सामना – ४ सप्टेंबर

दुसरा टी-२० सामना – ६ सप्टेंबर

तिसरा टी-२० सामना – ८ सप्टेंबर
———————————————————————–

पहिला वन-डे सामना – ११ सप्टेंबर

दुसरा वन-डे सामना – १३ सप्टेंबर

तिसरा वन-डे सामना – १६ सप्टेंबर

१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलला सुरुवात होईल. करोनामुळे नवीन नियमांनुसार खेळाडूंना युएईत आल्यानंतर काही दिवस स्वतःला क्वारंटाइन करुन घ्यावं लागेल. त्यामुळे आयपीएलमध्ये महत्वाच्या संघांनाही सुरुवातीच्या आठवड्यांत प्रमुख परदेशी खेळाडूंव्यतिरीक्त मैदानात उतरण्याची तयारी करावी लागणार आहे.