14 December 2019

News Flash

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या गर्लफ्रेंडने युवराजवर केला ‘हा’ आरोप

कॅनडाच्या टी २० लीगमधील घटना

टीम इंडियाचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून IPL २०१९ नंतर निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर तो सध्या ग्लोबल टी२० कॅनडा या स्पर्धेत खेळत आहे. स्पर्धेदरम्यान युवराजने अष्टपैलू बेन कटींग आणि त्याची गर्लफ्रेंड एरिन हॉलंड यांची एक प्रश्न विचारून चांगलीच कोंडी केली होती. त्यानंतर आता बेन कटींगची गर्लफ्रेंड एरिन हॉलंड हिने युवराज सिंगवर एक आरोप केला आहे.

सामन्यापूर्वी एरिन हॉलंड बेन कटींगची मुलाखत घेत होती. ती त्याची मुलाखत घेत असतानाच युवराज मध्येच आला. मुलाखतीमध्ये जाऊन युवराजने त्यांना ‘लग्न कधी करणार?’ असा थेट प्रश्न केला. युवराजचा हा प्रश्न ऐकून बेन कटींग आणि त्याची गर्लफ्रेंड हॉलंड यांना हसू अनावर झाले. पण युवराजने मात्र लगेच तेथून पळ काढला. ग्लोबल टी२० कॅनडाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर हा मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

युवराजने मजेशीर पद्धतीने हा प्रश्न विचारला होता. पण या व्हिडीओनंतर प्रेक्षकांनीही या प्रश्नाची दखल घेतली आणि सामन्यादरम्यान हॉलंड आणि कटींगला हा प्रश्न विचारू लागले. ग्लोबल टी २० लीगच्या दुसऱ्या पात्रता फेरीत एका चाहत्याने हॉलंडला हाच प्रश्न विचारला. ब्रॅम्प्टन वोल्व्ह आणि विनिपेग हॉक्स यांच्यातील सामन्यादरम्यान एक चाहता चक्क हातात फलक घेऊन उभा होता. त्यावर लिहीले होते की,” ग्लोबल टी २० लीगची अंतिम फेरी उद्या होणार आहे, परंतु तुम्ही लग्न कधी करणार?” हा प्रश्न एरिन आणि बेन यांच्यासाठी होता. तो फोटो शेअर करत ‘हे सगळं तुझ्यामुळे घडलं’ असा आरोप तिने युवराजवर केला.

दरम्यान, युवराजच्या आधीच्या प्रश्नावर बेन कटींगची गर्लफ्रेंड एरिन हॉलंड हिने ‘चिंता करू नकोस युवराज, बेन आणि मी तुला लग्नाला नक्की बोलवू’, असे उत्तर दिले होते.

First Published on August 13, 2019 6:18 pm

Web Title: australia cricketer ben cutting girlfriend erin holland blame yuvraj singh canada t20 league vjb 91
Just Now!
X