चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात असलेल्या चेतेश्वर पुजाराला ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने फलंदाजीबाबत मोलाचा सल्ला दिला आहे. टी २० सामने आणि कसोटी सामन्यात खेळण्याची रणनिती वेगळी असून आक्रमकपणे खेळण्याचा सल्ला ब्रेट लीने दिला आहे.

‘मी चेतेश्वार पुजारा मोठा चाहता आहे. पुजारा एक चांगला क्रिकेटपटू आहे. त्यामुळे त्याच्या खेळावर शंका घेण्याचं कारण नाही. मात्र असं असलं तरी टी २० आणि कसोटी क्रिकेट यात फरक आहे. टी २० सामन्यात २० षटकं ९० मिनिटात संपून जातात. त्यामुळे इथे खूप वेगाने धावसंख्या उभं करणं गरजेचं असतं. आम्ही पुजाराला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाहिलंय. त्याला खेळपट्टीवर तग धरून खेळणं आवडतं. त्यामुळे त्याच्यावर टी २० सामन्यात चांगल्या कामगिरीचं दडपण असेल असं वाटतं. पण तो दडपण दूर करेल अशी आशा आहे. त्याच्याकडे फलंदाजीसाठी लागण्याऱ्या सर्व जमेच्या बाजू आहेत. आता टी २० सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.’ असं ब्रेट लीने सांगितलं.

‘‘खरंच आम्ही नशिबवान आहोत…”, करोनाबाबत रोहित शर्माने व्यक्त केल्या भावना

आयपीएलच्या मागील सहा हंगामात चेतेश्वर पुजाराची फलंदाजी पाहता त्याला कोणत्याही फ्रेंचाईसीने खरेदी केलं नव्हतं. यंदाच्या आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने ५० लाखांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केलं आहे. त्यामुळे मोठ्या खंडानंतर पुजाराचं आयपीएलमध्ये पुनर्रागमन झालं आहे. आता या आयपीएल पर्वात त्याच्यावर आक्रमकपणे फटकेबाजी करण्याचं आव्हान असणार आहे. या आयपीएलमध्ये चेतेश्वर पुजारा गतीने धावसंख्या करतो की नाही याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष असणार आहे.