एकेकाळी जगभरातील क्रिकेटवर दबदबा असलेला ऑस्ट्रेलियाचा संघाला उतरती कळा लागलेली दिसून येत आहे. या हंगामात झालेल्या एकदिवसीय आणि कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २०१८ मध्ये एकदिवसीय सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाची कामगिरी हाँगकाँग, नेपाळ, झिम्बाम्बे संघापेक्षा खालावलेली आहे. या हंगामात ऑस्ट्रेलियाच्या संघाला एकदिवसी सामन्यात दहा टक्केही सामने जिंकता आलेले नाहीत. चालू सत्रामध्ये ऑस्ट्रेलिया संघाची एकदिवसी सामन्यातील कामगिरी ९.०९ टक्के आहे. एकदिवसीय सामने खेळणाऱ्या संघामध्ये ऑस्ट्रेलियाची ही कामगिरी १७ व्या स्थानावर आहे. वर्षभराच्या कामगिरीचा आलेख काढल्यास ऑस्ट्रेलिया संघाची विजयाची सरासरी तळाला आहे. या हंगामात इंग्लंड संघाची कामगिरी सर्वात अव्वल आहे. इंग्लंडची या वर्षभरातील विजयाची सरासरी ७३.९ टक्के आहे. दुसऱ्या स्थानावर भारत आणि न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघाची सरासरी ७० टक्के आहे. या क्रमवारीत बांगलादेशचा संघ तिसऱ्या स्थानावर असून त्यांची विजयाची सरासरी ६४.७ टक्के आहे.

२०१८ मधील कसोटी आणि एकदिवसीय सामन्यातील ऑस्ट्रेलियाची कामगिरी (छायाचित्र सैजन्य espncricinfo)

८० आणि ९० च्या दशकात वेस्ट इंडिजचा कसोटी क्रिकेटमध्ये जसा दबदबा होता, तसा ऑस्ट्रेलियाने ठेवला होता. मात्र आता त्यांचा दबदबा कमी झाला आहे. या वर्षात सलग पराभव त्यांच्या लौकिकाला शोभेसे नाहीत. ऑस्ट्रेलिया संघ केवळ मायदेशात हरलेला नाही. विदेशातही त्यांना मानहानिकारक पराभव पाहावा लागला होता. आता झालेल्या पाकिस्तान दौऱ्यातही ऑस्ट्रेलियाला मानहाणीकारक पराभवाचा सामना करावा लागाला आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये हा संघ खुपच कुमकुवत भासतोय.

एकदिवसीय सामन्याप्रमाणे कसोटीमध्येही त्यांची अवस्था फारशी चांगली दिसत नाही. स्मिथ आणि वॉर्नरच्या अनुपस्थित संघ आतिशय दुबळा वाटतोय. कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाला दोन विजय पाच पराभव मिळाले आहेत. आणि एक सामना अनिर्णीत राखण्यात यश आले आहे. ऑस्ट्रेलिया संघाची कामगिरी दिवसेंदिवस ढासळताना दिसत आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यापेक्षा टी-२० मधील ऑस्ट्रेलियाची कामगिरी सन्मानजनक दिसतेय. २०१८ च्या हंगामात ऑस्ट्रेलियाने १५ टी२० सामन्यातील ९ मध्ये विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाची २०१८ मधील टी-२० तील कामगिरी (छायाचित्र सैजन्य espncricinfo)

ऑस्ट्रेलिया संघ हरल्यापेक्षा त्यांनी प्रतिस्पध्र्याना सहज विजय बहाल केले आहेत. हार-जीत हा खेळाचा एक भाग असला तरी लागोपाठचे पराभव चिंताजनक बाब आहे. ऑस्ट्रेलिया संघ पराभवाची मालिका खंडित करू शकेल. मात्र त्यांनी पराभवातून बोध घ्यायला हवा.