ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड कसोटी मालिका

गोलंदाजांच्या जागतिक कसोटी क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या पॅट कमिन्सने (५/२८) केलेल्या भेदक गोलंदाजीला जेम्स पॅटिन्सन (३/३४) आणि मिचेल स्टार्क (२/३०) यांची उत्तम साथ लाभल्यामुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव १४८ धावांत गुंडाळून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेण्याच्या दिशेने वाटचाल केली.

प्रत्युत्तरात पहिल्या डावात ३१९ धावांची आघाडी मिळूनही फॉलोऑन न लादणाऱ्या ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ४ बाद १३७ धावा केल्या आहेत. मॅथ्यू वेड १५, तर ट्रेव्हिस हेड १२ धावांवर खेळत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने एकूण ४५६ धावांची आघाडी मिळवली आहे.

त्यापूर्वी, शुक्रवारच्या २ बाद ४४ धावांवरून पुढे खेळताना न्यूझीलंडचा डाव कमिन्स, स्टार्क आणि पॅटिन्सनच्या त्रिकुटापुढे कोलमडला. टॉम लॅथम (५०) वगळता न्यूझीलंडचा एकही फलंदाज २०हून अधिक धावा करू शकला नाही.

संक्षिप्त धावफलक

* ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ४६७

* न्यूझीलंड (पहिला डाव) : ५४.५ षटकांत सर्व बाद १४८ (टॉम लॅथम ५०, नील वॉगनर नाबाद १८; पॅट कमिन्स ५/२८)

* ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ४५ षटकांत ४ बाद १३७ (डेव्हिड वॉर्नर ३८, जो बर्न्‍स ३५; नील वॉगनर २/३९)