दीपक जोशी

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या नऊ विश्वचषकाच्या लढतींपैकी दोघेही प्रत्येकी तीन वेळा धावांच्या फरकाने प्रथम फलंदाजी करीत जिंकले आहेत. परंतु धावांचा पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने दोन आणि पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे. परंतु विश्वचषकातील महत्त्वाच्या तीन सामन्यांत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला हरवले आहे. यात १९८७ची उपांत्य फेरी, १९९९ची अंतिम फेरी आणि २०१५च्या उपांत्यपूर्व फेरीचा समावेश आहे. मागील १४ सामन्यांचा आढावा घेतल्यास पाकिस्तानला विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकमेव लढत जिंकता आली आहे. त्यामुळे बुधवारी पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व झुगारणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.