News Flash

भारतामध्ये ऑस्ट्रेलियाला चांगलीच मेहनत घ्यावी लागेल -लिऑन

भारताने गेल्या वर्षभरात कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे

| January 14, 2017 02:37 am

भारताने गेल्या वर्षभरात कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला त्यांच्याविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत चांगलीच मेहनत घ्यावी लागेल, असे मत फिरकीपटू नॅथन लिऑनने व्यक्त केले आहे.

‘‘गेल्या दहा वर्षांमध्ये भारतीय संघ मायदेशात ४९ कसोटी सामने खेळला, यामध्ये त्यांना फक्त चार सामन्यांमध्येच पराभवाचा सामना करावा लागला. ही आकडेवारी पाहता आमच्यासाठी भारताचा दौरा कठीण असेल. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आम्हाला चांगलीच ठेवावी लागेल,’’ असे लिऑन म्हणाला.

भारतीय दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा संघ चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला कसोटी सामना पुण्यामध्ये २३ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना बंगळुरू येथे ४-८ मार्च या कालावधीमध्ये होणार आहे. तिसरा कसोटी सामना रांची येथे १६-२० मार्च या दरम्यान होईल, तर अंतिम कसोटी सामना २५-२९ मार्च या कालावधीमध्ये धरमशाला येथे होणार आहे.

 

ऑस्ट्रेलियाचा शानदार विजय; व, फॉकनर चमकले

ब्रिस्बेन : मॅथ्यू वॅडचे नाबाद शतक आणि जेम्स फॉकनरची करामती गोलंदाजी (४/३२) या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ९२ धावांनी शानदार विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २६८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची सुरुवातीला ५ बाद ७८ अशी अवस्था झाली. पण आणि ग्लेन मॅक्सवेल (६०) यांनी सहाव्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. त्यानंतर पाकिस्तानचा डाव ४२.४ षटकांत १७६ धावांत आटोपला. पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक ३३ धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 2:37 am

Web Title: australia may have to play ugly against india nathan lyon
Next Stories
1 विजयाच्या सप्तपदीसाठी सेरेनाचा मार्ग बिकट
2 नव्या स्पर्धा विक्रमासाठी मुंबई धावणार
3 प्रीमिअर बॅडमिंटन लीग: सिंधूने केली सायना नेहवालवर मात
Just Now!
X