सहा तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेला सुरूवात होत आहे. त्यापूर्वी माजी कर्णधार मायकल क्लार्कने ऑस्ट्रेलियाच्या संघाला आक्रमक खेळ करण्याचा सल्ला दिला आहे.

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात, आपली तीच शैली आहे. आपल्या आक्रमक शैलीनुसार खेळायला हवे. भारताविरूद्ध जिंकायचे असल्यास आक्रमक खेळत राहा, मग ते लोकांना आवडो अगर न आवडो. लोकांच्या मनाचा विचार करायला गेलात, तर तुम्ही त्यांची मनं जिंकाल. पण, सामना जिंकता येणार नाही, असा ऑस्ट्रेलियाला विश्वचषक विजेता माजी कर्णधार मायकल क्लार्कने दिला आहे. मॅक्वरी स्पोर्ट्स रेडियोशी तो बोलत होता. यावेळी बोलताना मायकल क्लार्कने वॉर्नरने तोंडभरून कौतुकही केले. वॉर्नरकडे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होण्याचे सर्व गुण आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आपल्या शैलीप्रमाणे खेळ केला तरच भारताविरूद्ध विजय मिळवता येईल. बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूमधील आक्रमकपणा कमी झाला आहे. याबद्ल त्याने नाराजी व्यक्त केली. लोकांना काय आवडते यापेक्षा सामना जिंकणे म्हत्वाचे आहे. त्यामुळे लोकांचा विचार न करता सामना कसा जिंकता येईल याकडे ऑस्ट्रेलियाच्या संघाने लक्ष द्यायला हवे असे मत क्लार्कने व्यक्त केले.

‘यावेळी क्लार्कने वॉर्नरच्या आक्रमक शैलीचे उदाहरण दिले. वॉर्नर थेट संभाषण करतो. तुमचं बलस्थान, तुमचा कमकुवतपणा होऊ शकतो. एखाद्या कर्णधाराला हवा असलेला आक्रमकपण वॉर्नरकडे आहे, असे क्लार्क म्हणाला.’