News Flash

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड कसोटी मालिका : हेडच्या शतकामुळे ऑस्ट्रेलिया सुस्थितीत

दुसऱ्या दिवसअखेर टॉम लॅथम ९, तर अनुभवी रॉस टेलर २ धावांवर खेळत आहे.

ट्रेव्हिस हेड ११४ चेंडू २३४ चौकार १२

पहिल्या डावात ४६७ धावांचा डोंगर; न्यूझीलंडची २ बाद ४४ अशी अवस्था

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील ‘बॉक्सिंग डे’ क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथचे (८५ धावा) शतक पाहण्यासाठी मेलबर्न स्टेडियमवर जमलेल्या ६० हजार चाहत्यांची इच्छा युवा ट्रेव्हिस हेडने (११४ धावा) पूर्ण केली. त्याने साकारलेल्या शतकाला कर्णधार टिम पेनच्या (७९ धावा) अर्धशतकाची उत्तम साथ लाभल्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६७ धावा केल्या. प्रत्युतरात न्यूझीलंडची २ बाद ४४ धावा अशी अवस्था करून त्यांनी आघाडीच्या दिशेने कूच केली आहे.

दुसऱ्या दिवसअखेर टॉम लॅथम ९, तर अनुभवी रॉस टेलर २ धावांवर खेळत आहे. परंतु कर्णधार केन विल्यम्सन (९) आणि सलामीवीर टॉम ब्लंडेल (१५) यांना लवकर गमावल्यामुळे न्यूझीलंड ४२३ धावांची पिछाडी भरून काढणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

त्यापूर्वी, गुरुवारच्या ४ बाद २५७ धावांवरून पुढे खेळताना स्मिथ शतक झळकावण्यात अपयशी ठरला. त्यानंतर हेड आणि पेन यांनी सहाव्या गडय़ासाठी १५० धावांची भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाचा ४०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. ३५ वर्षीय पेनला कारकीर्दीतील पहिले शतक झळकावण्याची संधी होती. मात्र तो ७९ धावांवर माघारी परतला. हेडने मात्र १२ चौकारांसह ११४ धावांवर बाद होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत नेले. न्यूझीलंडकडून नील व्ॉगनरने सर्वाधिक चार बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

* ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १५५.१ षटकांत सर्व बाद ४६७ (ट्रेव्हिस हेड ११४, स्टीव्ह स्मिथ ८५; नील व्ॉगनर ४/८३)

* न्यूझीलंड (पहिला डाव) : १८ षटकांत २ बाद ४४ (टॉम ब्लंडेल १५, टॉम लॅथम खेळत आहे ९; पॅट कमिन्स १/८)

२ ट्रेव्हिस हेडने कसोटी कारकीर्दीतील तसेच वर्षांतील दुसरे शतक झळकावले. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने नाबाद १६१ धावांची खेळी साकारली होती.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 1:48 am

Web Title: australia new zealand test australia in good position after travis head century zws 70
Next Stories
1 इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीग : लिव्हरपूलचे अग्रस्थान अबाधित
2 धोनीची टिंगल करणारा शोएब मलिक तुफान ट्रोल
3 “भारतावर बहिष्कार घाला”; जावेद मियाँदाद बरळला…
Just Now!
X