29 May 2020

News Flash

ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान कसोटी मालिका : ऑस्ट्रेलियाच्या विजयात लायनचा सिंहाचा वाटा

सोमवारी पाकिस्तानने ३ बाद ३९ धावांवरून दुसऱ्या डावाला प्रारंभ केला. फक्त २३९ धावांत आटोपला.

 

पाकिस्तानविरुद्ध मालिकेत निर्भेळ यश

अ‍ॅडलेड : फिरकी गोलंदाज नॅथन लायनने अर्धशतकवीर शान मसूद (६८) व असद शफिक (५७) यांच्यासह पाच फलंदाजांना तंबूत पाठवत पाकिस्तानचा दुसरा डाव गुंडाळण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि ४८ धावांनी विजय मिळवत मालिकेतही २-० असे निभ्रेळ यश मिळवले.

ऑस्ट्रेलियाने ३ बाद ५८९ धावांवर पहिला डाव घोषित केला. यात महत्त्वाचे योगदान देताना संस्मरणीय नाबाद ३३५ धावांची खेळी साकारणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. सोमवारी पाकिस्तानने ३ बाद ३९ धावांवरून दुसऱ्या डावाला प्रारंभ केला. फक्त २३९ धावांत आटोपला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ३ बाद ५८९ डाव घोषित

पाकिस्तान (पहिला डाव) : ३०२

पाकिस्तान (दुसरा डाव) : ८२ षटकांत सर्व बाद २३९ (शान मसूद ६८, असद शफिक ५७; नॅथन लायन ५/६९)

 सामनावीर आणि मालिकावीर : डेव्हिड वॉर्नर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 2:22 am

Web Title: australia pakistan test series akp 94
Next Stories
1 इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : ‘आयपीएल’ लिलावात ९७१ खेळाडू
2 नियुक्ती प्रशिक्षकाची, पण जबाबदारी व्यवस्थापकाची!
3 मुंबईचे यशस्वी, अथर्व आणि दिव्यांश भारतीय संघात!
Just Now!
X