News Flash

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दुबईत सराव

भारतात सर्वच कसोटी सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.

| January 3, 2017 02:50 am

भारताच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट कसोटी संघ

दुबईत सराव करणार आहे. भारतीय वातावरण व खेळपट्टय़ांशी अनुकूलता मिळावी, या दृष्टीने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे उच्च कामगिरी सरव्यवस्थापक पॅट होवार्ड यांनी सांगितले की, ‘‘ऑस्ट्रेलियाने २००४ पासून भारतात एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. २०१३ मध्ये त्यांना भारतात सर्वच कसोटी सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळेच सर्वोत्तम कामगिरी व्हावी यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अकादमीत सराव करणार आहे. या अकादमीत अतिशय चांगल्या दर्जाच्या खेळपट्टय़ा तयार करण्यात आल्या आहेत. तेथे फिरकीबरोबरच जलदगती व मध्यमगती गोलंदाजांना पोषक अशा खेळपट्टय़ाही आहेत. त्यामुळे आमच्या खेळाडूंना चांगला सराव करण्याची संधी मिळेल.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 2:50 am

Web Title: australia practices in dubai for indias tour
Next Stories
1 मुंबईत सिंधू जिंकणार?
2 भारतीय वंशाच्या सिक्युरिटी गार्डने ऑस्ट्रेलियाच्या स्टेडियममध्ये टिपला अफलातून झेल
3 VIDEO: अहमद शेहजाद हुबेहूब धोनीचा हेलिकॉप्टर शॉट लगावतो तेव्हा..
Just Now!
X