भारताविरोधीत एकदिवसीय आणि टी-२० संघाची घोषणा क्रिकेट ऑस्टेलियानं केली आहे. पुढील महिन्यापासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होत आहे. भारतीय संघ दुबईतून १४ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ३ एकदिवसीय, ४ कसोटी आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्व अनुभवी एरॉन फिंचकडे असेल. १८ जणांच्या संघामध्ये २१ वर्षीय अष्टपैलू कॅमरॉन ग्रीनला संधी देण्यात आली आहे. तर मोइसेस हेनरिक्सचेही ऑस्ट्रेलियाच्या संघात पुनरागमन झाले आहे.

असा आहे अस्ट्रेलियाचा संघ –
एरॉन फिंच (कर्णधार), सीन अबॉट, अ‍ॅश्टन एगर, अ‍ॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (उपकर्णधार), कॅमरॉन ग्रीन, जॉश हेजलवूड, मोइसेस हेनरिक्स , मारनस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, एडम जम्पा.


काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने (BCCI) देखील भारतीय संघाची घोषणा केली होती. या दौऱ्यासाठी मुंबईचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आलेले नाही, पण IPLमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

भारताचा टी२० संघ –
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती

भारताचा एकदिवसीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.

टीम इंडियाचा प्रस्तावित ऑस्ट्रेलिया दौरा
पहिला वन-डे सामना – २७ नोव्हेंबर – सिडनी
दुसरा वन-डे सामना – २९ नोव्हेंबर – सिडनी
तिसरा वन-डे सामना – १ डिसेंबर – मनुका ओव्हल
————————————————————–
पहिला टी-२० सामना – ४ डिसेंबर – मनुका ओव्हल
दुसरा टी-२० सामना – ६ डिसेंबर – सिडनी
तिसरा टी-२० सामना – ८ डिसेंबर – सिडनी