‘‘स्टीव्हन स्मिथने चेंडूत फेरफार केल्याची कबुली दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू टीकेचे लक्ष्य झाले आहेत. अ‍ॅशेस मालिकेतही असे कृत्य सर्रास केले जाते,’’ असा आरोप इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने केला आहे.

वॉन म्हणाला, ‘‘आमच्याविरुद्ध मिडऑफ किंवा मिडऑनला क्षेत्ररक्षण करणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या हालचाली नेहमीच संशयास्पद असतात. चेंडूत फेरफार करण्यासाठी ते खिशात खरकागद किंवा तत्सम साहित्य ठेवतात, असे माझे ठाम मत आहे. त्यांच्याकडून अशी कृत्ये होत असतात. आम्ही अ‍ॅशेस मालिका गमावण्याचे तेही एक कारण असू शकते. चेंडूत फेरफार केल्यामुळे तो कशाही प्रकारे स्विंग होऊ शकतो. काही खेळाडू या मताशी सहमत होणार नाहीत; तथापि हे आरोप मी सिद्ध करायला तयार आहे.’’