News Flash

ऑस्ट्रेलिया ‘अ’चा शानदार विजय

कर्णधार मॅथ्यू व्ॉडच्या दमदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने तिरंगी मालिकेतील बुधवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघावर १०८ धावांनी दणदणीत विजय साजरा केला.

| August 13, 2015 06:47 am

कर्णधार मॅथ्यू व्ॉडच्या दमदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने तिरंगी मालिकेतील बुधवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघावर १०८ धावांनी दणदणीत विजय साजरा केला.
येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव ४७.२ षटकांत २७२ धावांत गडगडला. ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार व्ॉडने १०६ चेंडूंत १३० धावांची खेळी केली. त्याला पीटर हँड्सकोम्बने ५२ धावांची खेळी करून चांगली साथ दिली.
या उत्तरात उतरलेल्या आफ्रिकेच्या फलंदाजांना कॅमेरुन बोयेस आणि अ‍ॅस्टन अगरने एकामागोमाग धक्के दिले. त्यामुळे आफ्रिकेला ३७.१ षटकांत सर्वबाद १६४ धावांवर समाधान मानावे लागले. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर (६४) आणि खाया झोंडो (४७) यांनी संघर्ष दाखवला.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया ‘अ’ : सर्वबाद २७२ (मॅथ्यू व्ॉड १३०, पीटर हँड्सकोम्ब ५२; लोनवाबो त्सोत्सोबे ३/५०) विजयी वि. दक्षिण आफ्रिका ‘अ’: सर्वबाद १६४ (डीन एल्गर ६४, खाया झोंडो ४७; कॅमरुन बोयेस ३/४८, अ‍ॅस्टन अगर ३/४१, नॅथन-कल्टर-निले २/८).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2015 6:47 am

Web Title: australia team a win the match
Next Stories
1 मुंबई हॉकी असोसिएशन निवडणूक : सत्ताधाऱ्यांचे संस्थान कायम
2 ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात अगर आणि बर्न्‍स
3 हिकेनला न्यायालयाचा दिलासा नाहीच
Just Now!
X